भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक म्हणजे ‘व्होडाफोन-आयडिया’(Vodafone-Idea). सध्या सर्वच कंपन्यांचे डेटा प्लॅन अतिशय महाग झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला परवडतील असे रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी काढणे अतिशय गरजेचे आहे. हीच परिस्थिती हेरून सर्व टेलिकॉम कंपन्या वेगवेगळे आणि परवडणारे प्लॅन ग्राहकांसाठी घेऊन येत आहेत.
ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या हेतुने Vodafone-Idea कंपनीने पोस्टपेड सर्व्हिस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी भन्नाट प्लॅन आणले आहेत. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना तीन वेगवेगळे रिचार्ज प्लॅन मिळणार आहेत. यालाच ‘व्हॅल्यू फॉर मनी फॅमिली प्लॅन’ असे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लोक हा प्लॅन वापरू शकणार आहेत. त्यासाठी युझर्सला फक्त एका प्लॅनचे पैसे भरावे लागणार आहेत.
699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
व्होडाफोन-आयडियाचा 699 रुपयांचा हा प्लॅन एक फॅमिली प्लॅन आहे. ज्यामध्ये युझर्सला 2 कनेक्शन दिले जात आहेत. जसे की, कुटुंबातील एका व्यक्तीने हा प्लॅन घेतला असेल, तर कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीलाही हा प्लॅन वापरता येणार आहे. यासाठी त्या युझर्सकडे फक्त त्याच कंपनीची पोस्टपेड सेवा असणे गरजेचे आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला अनलिमिटेड कॉल (Unlimited Calling) करता येणार आहेत. सोबतच 40GB डेटाही मिळणार आहे. तसेच दोन युझर्सना मिळून 3000 एसएमएस (SMS) करता येणार आहेत.
999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
व्होडाफोन-आयडियाचा 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये युझर्सला एकूण 4 कनेक्शन दिले जाणार आहेत. म्हणजे हा एकच प्लॅन त्याच किमतीत 4 जण वापरू शकतात. या प्लॅनमध्ये युझर्सला अनलिमिटेड कॉलची (Unlimited Calling ) सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय 140 GB डेटा दिला जाणार आहे. पण मुख्य युझर्स वगळता इतर 3 जणांना 40GB डेटा वापरता येणार आहे. तसेच युझर्सला पुढील 6 महिन्यांसाठी मोफत Amazon Prime चे सबस्क्रिप्शन (Subscription) दिले जाणार आहे. एका छोट्या कुटुंबासाठी हा प्लॅन अतिशय फायदेशीर ठरू शकतो.
1149 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
व्होडाफोन-आयडियाच्या 1149 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये युझर्सला एकूण 5 कनेक्शन देण्यात येणार आहेत. साहजिकच वरील प्लॅननुसार यामध्ये देखील 5 जण याचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये युझर्सला अनलिमिटेड कॉलची (Unlimited Calling) सुविधा देण्यात आली. तसेच मुख्य युझर्सला 140 GB डेटा मिळणार असून इतर 4 जणांना 40 GB डेटा वापरता येणार आहे. याशिवाय युझर्सला एका वर्षासाठी Disney Hotstar आणि Amazon Prime चे फ्री सबस्क्रिप्शन (Subscription) दिले जाणार आहे.
Source: https://bit.ly/3ZAff4v