Visa free travel countries: परदेशात फिरायला जाण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. बऱ्याच वेळा आपले फिरायला जाण्याचे प्लॅन्सही ठरतात मात्र व्हिजा(Visa), पासपोर्ट(passport) नसल्याने आपल्याला हे प्लॅन कॅन्सल करून इथेच लोणावळा माथेरानला फिरायला जावे लागते. पण आता निराश होण्याची गरज नाही. कारण आम्ही तुमच्याला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे विना व्हिजा तुम्ही सहज प्रवास करु शकता. येणाऱ्या नव्या वर्षांमध्ये तुम्ही परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर 'या' देशांमध्ये तुम्ही ठिकाणी सहज फिरून येऊ शकता आणि तेही विना व्हिसा(Visa free travel countries). या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र किंवा काही देशांसाठी भारतीय पासपोर्टची आवश्यक आहे. चला तर अशाच ४ अतिशय सुंदर देशांबद्दल जाणून घेऊयात
Table of contents [Show]
जमैका (Jamaica)
भारतीय (India) नागरिकांना जमैकामध्ये ३० दिवस राहण्यासाठी पर्यटक व्हिजाची आवश्यक नाही.जमैकाचा उल्लेख करताच आपल्या डोळ्यासमोर समुद्रकिनाऱ्याचे दृश्य उभे राहते. हिरवीगार डोंगराळ जंगले, उंच कडा असलेले किनारे आणि प्रेक्षणीय नाईटलाईफसाठी या ठिकाणाला ओळखले जाते. या ठिकाणच्या समुद्राच्या लाटांमध्ये जीवनाचा आनंद लुटण्यासाठी एकदा तरी नक्की या ठिकाणाला भेट द्या.
हाँगकाँग (Hong Kong)
हाँगकाँगमध्ये भारतीय पासपोर्ट धारकांना 14 दिवसांचा फ्री व्हिजा मुक्काम देण्यात येतो. यासाठी तुम्हाला फक्त भारतातून थेट हाँगकाँगला जावे लागेल. हाँगकाँग हा आशियातील सर्वात सुंदर देश आहे, या देशातील शहरांमधील नाईटलाईफ आणि सौंदर्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. भारतातील जवळपास सर्व प्रमुख विमानतळांवरून हाँगकाँगला थेट उड्डाणे केली जातात.
नेपाळ (Nepal)
भारताचे शेजारील राष्ट म्हणजे नेपाळ. जिथे भारतीय लोकांना प्रवास करण्यासाठी व्हिजा किंवा पासपोर्टची आवश्यकता लागत नाही. येथे जाण्यासाठी तुम्हाला केवळ फोटो ओळखपत्र जरी असेल तरी चालू शकते. नेपाळ हा पर्वतांनी वेढलेला निसर्गसौंदर्य असलेला एक सुंदर देश असून ट्रेकर्ससाठी(trekkers) हा जणू स्वर्गच मानला जातो. येथील डोंगररांगांमध्ये ट्रेकिंगसाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्हाला भारतीय संस्कृतीही(Indian culture) पाहायला मिळेल.
भूटान (Bhutan)
भूटान हा भारतासाठी व्हिजा मुक्त देशांपैकी एक आहे. या ठिकाणची हिरवळ, हिमालयाची मनमोहक दृश्ये आणि नयनरम्य पर्यटन स्थळांच्या तुम्ही प्रेमातच पडाल. या देशात जाण्यासाठी तुम्हाला फक्त भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक आहे. भूटान हा जगातील सर्वात शांत ठिकाणांपैकी एक देश असून मनःशांती शोधणाऱ्या लोकांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथील डोचू ला पास(Dochu La Pass), गंगटे(Gangte), पारो(Paro), थिंपू(Thimphu), तख्तसांग(Takhtsang) आणि लखंग(Lakhang) सारख्या ठिकाणांना तुम्ही आवश्य भेट द्या.