Visa on Arrival: तुम्ही येणाऱ्या नववर्ष वेगवेगळ्या देशांमध्ये सहज फिरायला जाऊ शकता. जर तुम्ही 2023 मधील व्हिसा ऑन अरायव्हल (Visa on Arrival) देणाऱ्या देशांची यादी शोधत असाल तर आता इतरत्र कुठेच शोधण्याची गरज नाही. एक काळ होता जेव्हा दुसऱ्या देशात पर्यटनाकरिता जाण्यासाठी अगोदर Visa साठी अर्ज सादर करण्याची झंझट मागे लागायची. त्या लांबच लांब रांगा, कधीच न संपणारी कागदपत्रे, विविध प्रश्न आणि मग त्या कागदाच्या तुकड्याची दीर्घकाळ वाट बघणं. हा Visa म्हणजे जणू आपल्या प्रवासासाठीचे लायसन्सचं!
भारतीय पासपोर्ट धारकांना(Indian passport holders) आता बरेच देश Visa on Arrival सादर करीत आहेत, त्यामुळे परदेशात प्रवास करण्याचा अनुभव दडपण देणारा नक्कीच नसेल. 2023 मध्ये तुम्हीही तुमच्या बॅगा भरा आणि खालीलपैकी कुठल्याही देशात आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसमवेत फिरायला बाहेर पडा.
Table of contents [Show]
- टांझानिया (Tanzania)
- लाओस (Laos) - Visa on Arrival (30 दिवस)
- बोलिव्हिया (Bolivia) - Visa on Arrival (90 दिवस)
- जॉर्डन (Jordan)
- सामोआ (Samoa) - Visa on Arrival (60 दिवस)
- मंगोलिया (Mongolia) - Visa on Arrival (30 दिवस)
- पलाऊ (Palau) - Visa on Arrival (30 दिवस)
- मादागास्कर (Madagascar) - Visa on Arrival (90 दिवस)
- सेशेल्स (Seychelles) - Visa on Arrival (30 दिवस, 90 दिवसांपर्यंत)
- झिम्बाब्वे (Zimbabwe) - Visa on Arrival (90 दिवस)
टांझानिया (Tanzania)
आफ्रिकेतील सर्वात सुंदर देशांपैकी एक म्हणजे 'टांझानिया'. प्रसिद्ध सेरेनगेटी नॅशनल पार्क(Serengeti National Park) आणि किलिमंजारो नॅशनल पार्कसाठी(Kilimanjaro National Park) याला ओळखले जाते. जगातील सर्वोत्तम डेस्टिनेशन पैकी एक म्हणून याची ख्याती आहे. वन्यजीव आणि सुंदर नैसर्गिक देखावा पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही टांझानियाला भेट द्या.
लाओस (Laos) - Visa on Arrival (30 दिवस)
आग्नेय आशियातील एक अतिशय आकर्षक व बजेट फ्रेंडली पर्यटन स्थळ. वेगवेगळ्या पाककृती, अद्भुत स्मारके, बौद्ध मठ आणि जगातील काही सर्वात सुंदर नद्यांवरील बेट पाहण्यासाठी एकदा तरी लाओसला(Laos) नक्की भेट द्या.
बोलिव्हिया (Bolivia) - Visa on Arrival (90 दिवस)
बोलिव्हिया, दक्षिण अमेरिकेतील एक प्रकारचे आश्चर्यच आहे. सालार दे उयोनी (Salar de Uyuni), जगातील सर्वात मोठे सॉल्ट फ्लॅट आणि Titicaca तलाव पाहण्यासाठी, एक नवखी संस्कृती अनुभवण्यासाठी नक्कीच एकदा जाऊन या.
जॉर्डन (Jordan)
एक प्राचीन राष्ट्र म्हणून असलेली ख्याती जिथे सुंदर अवशेष, अप्रतिम समुद्रकिनारे आणि जगातील सर्वात स्वादिष्ट पाककृती मिळतात अशा डेस्टिनेशला एकदा तरी नक्की भेट द्या.
सामोआ (Samoa) - Visa on Arrival (60 दिवस)
सामोआ हा बेटांचा समूह आहे जिथे तुम्हाला निळेशार स्वच्छ पारदर्शक पाणी आणि त्यातील सागरी जीव, हिरवीगार जंगलं आणि धबधबे पाहायचे किंवा अनुभवायचे असतील तर सामोआ(Samoa) ला नक्कीच भेट द्या.
मंगोलिया (Mongolia) - Visa on Arrival (30 दिवस)
तुम्हाला जर जंगल सफारी किंवा वाळवंटाची सफारी करायची असेल तर हे डेस्टिनेशन तुमच्यासाठी एकदम भारी आहे. जंगलातील भटके वन्यजीव आणि तलावांनी तुमच्या डोळ्याचे पारनेच फिटेल.
पलाऊ (Palau) - Visa on Arrival (30 दिवस)
500 पेक्षा जास्त बेटांचा एक आश्चर्यकारक द्वीपसमूह म्हणून पलाऊची ख्याती आहे. तुम्हाला जर वॉटरस्पोर्ट्समध्ये सहभागी व्हायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच एकदा तरी पलाऊला भेट द्यायला हवी.
मादागास्कर (Madagascar) - Visa on Arrival (90 दिवस)
मादागास्कर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठे बेट असणारा देश आहे आणि त्याच्या संपूर्ण स्थलाकृतिसह एक अद्भुत देश म्हणून त्याची ओळख आहे. तेथे तुम्हाला राष्ट्रीय उद्याने, समृद्ध किनारपट्टीचा पट्टा आणि जगातील सर्वात अद्वितीय वनस्पती आणि प्राणी पाहायला मिळतील.
सेशेल्स (Seychelles) - Visa on Arrival (30 दिवस, 90 दिवसांपर्यंत)
जगातील सर्वोत्तम समुद्र किनाऱ्यांपैकी काही समुद्रकिनारे, समृद्ध निसर्गाचा देखावा, हिरवीगार जंगलं आणि गिर्यारोहणाचा आनंद, खोल पाण्यातील जहाजं असं सगळंच अनुभवायचं असेल तर सेशेल्सला नक्की व्हिजिट करा.
झिम्बाब्वे (Zimbabwe) - Visa on Arrival (90 दिवस)
झिम्बाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील सर्वात सुंदर देशांपैकी एक देश आहे. वाइल्ड लाईफ फोटोग्राफर्सकरिता हे लोकेशन एकदम सुंदर आहे. चित्तथरारक निसर्गरम्य देखावे, जंगली वन्यजीव आणि साहसी खेळांसाठी या जागेला विशेष करून ओळखले जाते.