Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FIFA World Cup 2022 : जिओ सिनेमावर मोफत पाहता येणार फिफा वर्ल्डकप 2022

Reliance Jio Cinema , FIFA World Cup 2022, FIFA

Image Source : Twitter.com

FIFA World Cup 2022 : कतारने स्टेडिअमध्ये फिफा वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी तिकीटांसोबत हय्या कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रत्येकालाच स्टेडिअममध्ये जाऊन स्पर्धेचा आनंद लुटता येणार नाही. तेव्हा फिफाच्या चाहत्यांना स्पर्धेचा लाईव्ह थरार पाहता यावा, यासाठी व्हायकॉम 18 मीडियाने जिओ सिनेमा अॅपवर या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमींग करणार आहे.

फिफा वर्ल्डकप 2022 (FIFA World Cup 2022 in Qatar) ची जगभरात धूम आहे. यंदा कतारमध्ये ही स्पर्धा पार पडत आहे. कतारने स्टेडियमध्ये फिफा वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी तिकीटांसोबत हय्या कार्ड अनिवार्य केले आहे.त्यामुळे प्रत्येकालाच स्टेडिअममध्ये जाऊन स्पर्धेचा आनंद लुटता येणार नाही. तेव्हा फिफाच्या चाहत्यांना स्पर्धेचा लाईव्ह थरार पाहता यावा यासाठी व्हायकॉम 18 मीडिया आपल्या जिओ सिनेमा अॅपवर या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणार आहे. 

फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या दूरचित्रवाणी प्रसारण आणि स्ट्रिमिंग हक्कांची मालकी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड टीव्ही ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मीडिया कंपनी व्हायकॉम 18 मीडिया आपल्या जिओ सिनेमा अॅपवर फिफा वर्ल्डकपच्या मॅचेस निशुल्क  दाखविण्यात येणार आहेत.  .

स्पर्धा मोफत पाहता येणार (Watch FIFA World Cup 2022 For Free)

20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान फिफा वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे. यंदा कतार मध्ये फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  भारतातील प्रमुख स्पोर्ट्स नेटवर्क असलेल्या वायकॉम 18 स्पोर्ट्सने जाहीर केले आहे की फिफा विश्वचषक 2022 चे सर्व सामने जिओ सिनेमावर थेट प्रसारित करण्यात येणार आहेत. जे आपल्या क्युरेटेड सामग्रीचे प्रसारण देखील करतील. जिओ सिनेमावर प्रेक्षकांना ही स्पर्धा अगदी मोफत पाहता येणार आहे. टीव्ही प्रसारणाच्या वेळापत्रकात स्पोर्ट्स18-1 एसडी आणि एचडी चॅनेलचा समावेश असणार आहे.

अॅप डाउनलोड करा (Download Jio Cinema app)

या गेम्सची कॉमेंट्री इंग्रजी, हिंदी, मल्याळम, बंगाली आणि तमिळ भाषेत उपलब्ध होणार आहे. हे गेम्स ग्राहकांना मोफत प्रसारित केले जाणार आहेत. म्हणून कोणीही पैसे भरण्याची गरज नाही. यासाठी कोणतेही सबस्क्रिप्शन शुल्क नसून प्रेक्षक फक्त अ ॅप डाउनलोड करून फुटबॉल स्पर्धेचा आनंद लुटू शकतात.