Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कप होस्ट करणाऱ्या देशाला पैसे देते?

FIFA WORLD CUP 2022

FIFA World Cup 2022 : फिफा ही एक Non-Profit Organization आहे; जी संस्थेकडे जमा होणारा पैसा फुटबॉल खेळाच्या विकासासाठी खर्च करते किंवा त्यावर सर्वाधिक गुंतवणूक ही करते.

FIFA - Federation International Football Association म्हणजेच International Federation of Association Football ची स्थापना 1904 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल  स्पर्धांच्या वाढत्या संख्येवर देखरेख ठेवण्यासाठी, या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि फुलबॉलच्या मॅचेसचे चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यासाठी करण्यात आली. Football हा खेळ 200 हून अधिक देशांमध्ये खेळला जातो. जगभरातील बहुतांश देशांमध्ये सर्व खेळांपैकी फूटबॉलचे  फॅन फॉलोइंग सर्वात जास्त आहे. फिफाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, FIFA ही संघटना फुटबॉल हा खेळ सर्वसमावेशक होण्यासाठी आणि यात नवनवीन बदल करण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. ही संघटना फक्त एक किंवा दोन खंडापुरती मर्यादित नाही तर जगभर हिला मान्यता आहे. सर्व देशांमध्ये फिफाचे समान पद्धतीने नियम फॉलो केले जातात.

फिफा Non-Profit Organization!

फिफा ही एक Non-Profit Organization आहे; जी संस्थेकडे जमा होणारा पैसा फुटबॉल खेळाच्या विकासासाठी खर्च करते किंवा त्यावर सर्वाधिक गुंतवणूक करते. फिफाच्या या वलयामुळे संघटनेलासुद्धा भरपूर कमाई होते. यापैकी बहुतेक कमाई ही प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे Organization आणि Marketing करून केली जाते.  यातील प्रमुख व सर्वात लोकप्रिय स्पर्धा म्हणजे  पुरुष आणि महिला विश्वचषक (FIFA World Cup – Men’s & Womens).  ही स्पर्धा दर चार वर्षांनी होत असते.

प्रत्येक देशाला होस्टिंगसाठी 110 दशलक्ष डॉलर!

Continental Championship आणि FIFA Confederations Cup सारख्या इतर स्पर्धाही बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. FIFA ने प्रत्येक देशाला Hosting साठी 110 दशलक्ष डॉलर आणि तिकीट विक्रीतून मिळणारा सर्व revenue देण्याचे आश्वासन दिले.

रशियाने 11 अब्ज तर ब्राझीलने 15 अब्ज डॉलर खर्चे केले होते!

दर चार वर्षांनी फुटबॉलचे चाहते एकत्र येतात आणि आपल्या आवडत्या संघांना आणि देशांना वर्ल्ड कप चॅम्पियन्सच्या अंतिम विजेतेपदासाठी खेळताना पाहतात. ही स्पर्धा दर काही वर्षांनीच होत असली, तरी host countries ना भरमसाठ किंमतीच्या Tag ची तयारी करण्यासाठी वेळेपूर्वीच माहिती दिली जाते. 2018 FIFA World Cup चा यजमान रशियाने सुमारे 11 अब्ज डॉलर्स खर्च केला असल्याची माहिती आहे. ही रक्कम सामान्यत: पर्यटक आणि खेळाडू दोघांनाही सामावून घेण्यासाठी सुधारित पायाभूत सुविधा आणि सुविधांसाठी वापरल्याचे सांगितले जाते. FIFAने केवळ या कार्यक्रमासाठी ऑपरेटिंग खर्चाचा समावेश केला आहे. वाहतूक आणि पायाभूत सुविधा यासारख्या गोष्टींमध्ये अतिरिक्त सुधारणा यजमान देशाच्या हातात आहेत. 2014च्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या ब्राझीलने सुमारे 15 अब्ज डॉलर खर्च केले होते. 

कतारची फिफा आयोजनासाठी जय्यत तयारी!

भविष्यातील Host Countries ने ही खर्चाची तयारी सुरू केली. Qatar 2022 च्या विश्वचषकाचे आयोजन करीत आहे आणि विश्वचषक प्रकल्पांवर दर आठवड्याला अंदाजे 200 अब्ज डॉलर्स किंवा 500 दशलक्ष डॉलर्स खर्च करीत आहे. दरम्यान, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे संघ 2026 च्या विश्वचषकासाठी संयुक्त यजमान असणार आहेत.

‘फिफा वर्ल्ड कप’ची  अर्थव्यवस्था

FIFA संघटनेवर पुरुष आणि महिला टीमसाठी वर्ल्ड कप आयोजित करण्याची जबाबदारी आहे. यामुळे या संघटनेला जगभरातून अब्जावधी डॉलर्सचा (Billons of dollars) महसूल मिळवणे सहजपणे साध्य होते. वर्ल्ड कपचे होस्टिंग कोण करणार हे ऑक्शन प्रक्रियेद्वारे निश्चित केले जाते. FIFA World Cup 2022 चे आयोजन आखातातील कतार हा देश करत आहे. तर 2026 मधील वर्ल्ड कपचे आयोजन अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको 2026 हे देश करणार आहेत.

FIFA बद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी!

• वर्ल्ड कपसारख्या फुटबॉल स्पर्धांसाठी टेलिव्हिजन, मार्केटिंग, लायसन्सचे हक्क विकून FIFA पैसे कमावते.
• विश्वचषक स्पर्धांसाठी पायाभूत सुविधांचा खर्च host countries वर सोडला जातो. 
• 2018 मध्ये फिफाने 4.6 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली होती.
• Non-profit organization म्हणून, FIFA आपल्या कमाईतील बहुतेक रक्कम फुटबॉल खेळाच्या विकासावर खर्च करते.
• फिफाचे दूरचित्रवाणी अधिकार (Television rights of FIFA )

2018 मध्ये फिफाने मिळवलेल्या 4.6 अब्ज डॉलर्सच्या महसुलापैकी 49% (सुमारे 3.13 अब्ज डॉलर्स) टेलिव्हिजन हक्कांमधून आले होते. FIFA टेलिव्हिजन स्टेशन्स आणि ब्रॉडकास्टिंग संस्थांना टेलिकास्टचे राईट्स विकते. ज्यामुळे त्यांना विशिष्ट प्रदेशात फुटबॉल खेळ आणि संबंधित कार्यक्रमांचे प्रसारण करण्याची परवानगी मिळते. कारण फुटबॉल जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे, परवाना हक्कांसाठी ब्रॉडकास्टर्समध्ये स्पर्धा तीव्र असते . ESPN आणि Twenty-first century fox inc. (FOXA) यांच्यात झालेल्या लिलावात FOX ने डिस्नेच्या ESPN ला मागे टाकले आणि 2022 च्या वर्ल्ड कपच्या माध्यमातून टेलिव्हिजन हक्कांसाठी FIFA ला 400 दशलक्ष डॉलर्स दिले. META INC. (META), पूर्वीचे Facebook, Twitter inc. (Twitter) आणि SNAP inc. (SNAP) या सर्वांनी FOX ला हायलाइट राईट्ससाठी लाखो डॉलर्सची ऑफर दिली.

फिफाच्या भविष्यातील योजना!

FIFA आपल्या Sponsorship मॉडेल्समध्ये वेळोवेळी सुधारणा करत असते. सध्या फिफाच्या चार वर्ल्ड कप स्पॉन्सरशिप लेव्हल्स आहेत. त्यात FIFA Partners, FIFA World Cup Sponsors, Regional Supporters,आणि National Supporters. या व्यतिरिक्त फिफा पार्टनरशीपमध्ये FIFA Brand डेव्हलप करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्यात नेहमी सक्रीयपणे सहभागी होत असते.