Varanasi overtaking Goa: नवीन वर्षाची सुरुवात(New Year Celebration Plan) आणि जुन्या वर्षाला बाय बाय करण्यासाठी प्रत्येकाचेच प्लॅन हे ठरलेले असतात. यासाठी कित्येक लोक वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास(Travel) करतात. नवीन वर्षाची सुरुवात साजरी करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणांना प्राधान्य देते. काहींना समुद्रकिनारा(Beaches) आवडतो तर काहींना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडतो. काही लोकांना धार्मिक स्थळांना(Religious Places) भेट द्यायला आवडते. यंदाच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ओयोच्या(OYO) ग्राहकांनी चक्क गोव्याला(Goa) मागे टाकत वाराणसीला(Varanasi) प्राधान्य दिलंय, अशी माहिती ट्विटरवरून(Twitter) खुद्द ओयोचे सीईओ रितेश अग्रवालांनी(CEO. Ritesh Agarwal) दिली आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
यंदा लोकांची पसंती 'वाराणसीला'
यंदाच्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही लोकांनी वाराणसीसारख्या(Varanasi) धार्मिक शहराला निवडल्यामुळे हॉटेल बुकिंगमध्ये(Hotel Booking) प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यासंदर्भात रितेश अग्रवालांनी सांगितले की, ओयो(OYO) 700 हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे. यावर्षी गोव्यासाठीचे हॉटेल बुकिंग हे तासातासाने वाढत होते मात्र गोव्यालाही(Goa) मागे टाकत यावेळी वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल्स बुकिंग झाले आहेत. लोकांनी कोविडच्या(Covid 19) भीतीला मागे टाकत आता पर्यटन स्थळांना भेट देण्यास सुरवात केली आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून यावर्षी शिमला(Shimla), गोवा(Goa), आग्रा(Agra) आणि वाराणसी(Varanasi) यासारख्या सुप्रसिद्ध शहरांना लोकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आहे ज्यामुळे या शहरांमधील हॉटेल्स मोठ्या प्रमाणावर बुक केले गेले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढले बुकींगचे प्रमाण
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जागतिक स्तरावर 450 हजाराहून अधिक बुकिंग करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 35 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या पाच वर्षामधील हे सर्वाधिक बुकिंग असल्याचे रितेश अग्रवाल यांनी सांगितले आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोक किती उत्साही असतात हे लोकांनी दाखवून दिले आहे . "ओयोच्या अँपवरील किंमती(OYO App Price) 12.7 दशलक्ष पटीने वाढल्या आहेत. हा सर्व कमाल शनिवार(Saturday) व रविवारच्या(Sunday) सुट्टीमुळे शक्य झाल्याचे सांगितले जात आहे.
दोन घटना ज्यामुळे वाराणसी पर्यटनाला मिळाली चालना
गेल्या वर्षभरात वाराणसी या पर्यटन स्थळामध्ये दोन प्रमुख कार्यक्रम पार पडले. पहिला म्हणजे काशी तमिळ संगम जो गेल्या महिन्यात आयोजित करण्यात आला होता आणि दुसरा म्हणजे डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM. Narendra Modi) यांनी नूतनीकरण केलेल्या मंदिर संकुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. या दोन घटना वाराणसी पर्यंटन स्थळांना चालना देण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.