UPSC Jobs 2022: सरकारी नोकरी आणि त्यामध्ये पण UPSC च्या जागा निघाल्या हे समजल्यावर कित्येक उमेदवारांची ऐनवेळेला तारांबळ उडते. अर्ज कुठे आणि कसा करायचा? त्यासाठी किती शुल्क आकारले जातील यासारखी माहिती नसल्याने चालून आलेली संधी हातातून निघून जाते. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
कोणत्या जागांसाठी भरती निघाली आहे?
- UPSC च्या या भरतीमध्ये एकूण 19 पदांची भरती केली जाणार आहे
- यामध्ये आर्किव्हिस्टच्या(Archivist) 13 पदे, स्पेशालिस्ट ग्रेड III(Specialist Grade III) ची 5 पदे आणि शास्त्रज्ञ 'B(Scientist 'B')' च्या 1 पदाचा समावेश करण्यात आला आहे
- या पदांसाठी अर्ज करण्याच्या विविध पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत
अर्ज कुठे आणि कसा करावा?
- नुकतीच UPSC ने भरती अधिसूचना जारी केली असून अनेक पदांसाठी भरती काढली आहे. ज्यासाठी पात्र उमेदवार अधिकृत साईट www.upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात
- अर्ज करण्यासाठी 29 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे
अर्ज शुल्क किती असेल?
- UPSC भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. या भरतीसाठी उमेदवारांना 25 रुपये शुल्क भरावं लागणार आहे
- SC/ST/PWBD/महिला उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्जासाठीचे शुल्क आकारले जाणार नाही
- उमेदवार अर्ज शुल्क SBI च्या नेट बँकिंग सेवेद्वारे किंवा रोखीने भरू शकतात उमेदवार व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड देखील वापरून शुल्क भरू शकतात
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काय?
- सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम यूपीएससीच्या(UPSC) अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी
- उमेदवाराने होम पेजवर संबंधित सूचना पाहून आवश्यक त्या कागदपत्रांना तेथे संलग्न करा
- त्यांनतर भरतीसाठी अर्ज फी भरा
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज डाऊनलोड करा
- अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून घ्या
भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची माहिती कोणती?
ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल त्या उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत कागदपत्रांची प्रिंट आऊट आणणे गरजेचे आहे.