Paytm Founder Vijay Shekhar Sharma Tweet: आज दिवसभऱ्यात प्रसार माध्यम आणि सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या अनेक बातम्यांनी UPI ने पेमेंट करणाऱ्या अनेक ग्राहकांच्या चिंतेत भर घातली होती. मात्र पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी एक ट्विट करुन ग्राहकांना अफवांपासुन दुर राहण्यास सांगितले आहे. तसेच ग्राहकांसाठी UPI चे शुल्क शून्य आहे.
Table of contents [Show]
काय होती अफवा
(NPCI) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने 1 एप्रिलपासून 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के कर लावण्याची सूचना केली होती.आणि हे शुल्क ग्राहकांना द्यावे लागणार होते.
NPCI ने दिले स्पष्टीकरण
हे लक्षात घेता, NPCI ने स्पष्टीकरण दिले आहे की 'UPI विनामूल्य, वेगवान, सुरक्षित आणि अखंड आहे'. NPCI ने आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, सुरू केलेले इंटरचेंज शुल्क केवळ PPI व्यापारी व्यवहारांसाठी लागू आहे आणि ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की,बँक खाते ते बँक खात्यावर आधारित UPI पेमेंटसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
पेटीएमचे संस्थापक शर्मा यांचे ट्विट
NPCI ने या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर, पेटीएमचे संस्थापक शर्मा म्हणाले, 'बँक खाते किंवा वॉलेटमधून UPI पेमेंट पूर्णपणे विनामूल्य आहे!. दुर्भावनापूर्ण अफवांना बळी पडू नका.'याचा अर्थ असा की कोणत्याही ग्राहकाला UPI वरून बँक खाते किंवा PPI मधून पेमेंट करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
डिजिटल पेमेंटचा एक पसंतीचा प्रकार म्हणून UPI उदयास
भारतात 'डीजीटल इंडीया' या योजनेला प्रोत्साहन देण्यात आले तेव्हा पासुन UPI हे मोफत, जलद, सुरक्षित आणि अखंड अनुभव देणारे डिजिटल पेमेंटचे माध्यम ठरले आहे. UPI पेमेंट्स करण्यास मोबाईल वरील अॅप हे आपल्या बॅंक खात्याशी लिंक केले जाते, हीच त्याची विश्वासहार्यता आहे. दिवसभरातील गोंधळ आणि अनेक अफवांनंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांचे ट्विट ग्राहकांना दिलासा देऊन गेले, हे मात्र खरे.