Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jan Aushadhi Kendra: 9 हजार औषधी केंद्रावर , 90 टक्क्यांपर्यंत स्वस्त औषधे उपलब्ध

pm jan aushadhi centers generic medicine price 50 to 90 percent lower than branded medicine

Government opened centers to get cheap medicines: देशातील 766 जिल्ह्यांपैकी 743 जिल्ह्यांमध्ये 9,000 हून अधिक जनऔषधी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे लोकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून दिली जातात.

Citizens are getting cheap medicines at the Jan Aushadhi kendra: देशातील प्रत्येक गरीबाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यासाठी केंद्र सरकार आयुष्मान भारत आरोग्य योजना राबवत आहे. उपचारासाठी वापरलेली औषधे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान जनऔषधी योजना चालवली जात आहे. जनऔषधी योजनेअंतर्गत देशभरात 9 हजार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांवर ब्रँडेड औषधांपेक्षा 50 ते 90 टक्के कमी दरात औषधे उपलब्ध आहेत.

पंतप्रधान जनऔषध योजना 2008 मध्ये सुरू झाली (PM Janaushadhi Yojana started)-

नोव्हेंबर 2008 मध्ये केंद्र सरकारने देशवासीयांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान भारतीय जनऔषधी प्रकल्प सुरू केला. या योजनेंतर्गत डिसेंबर 2017 मध्ये 3 हजार जन औषधी केंद्रे उघडण्यात आली. मार्च 2020 मध्ये एकूण 6 हजार आउटलेटचे उद्दिष्ट गाठले गेले. तर 2021 या आर्थिक वर्षात या केंद्रांची संख्या 8 हजार 610 इतकी होती. 2022 मध्ये 9 हजार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

743 जिल्ह्यांत 9 हजार केंद्रांवर औषधे उपलब्ध (Medicines availability)-

देशातील 766 जिल्ह्यांपैकी 743 जिल्ह्यांमध्ये 9 हजारहून अधिक जनऔषधी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तेथे जनतेला स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत. या केंद्रांमध्ये 1 हजार 759 प्रकारची, सर्वच रोगांवरील आणि आजारांवरील औषधे आणि 280 सर्जिकल उपकरणे उपलब्ध आहेत. यामध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी, कर्करोगविरोधी, मधुमेहविरोधी, संसर्गविरोधी, ऍलर्जीविरोधी, गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल आदींसाठी गरजेची औषधे आणि न्यूट्रास्युटिकल्स मिळतात. याशिवाय, न्यूट्रास्युटिकल उत्पादने, प्रोटीन पावडर, माल्ट-आधारित अन्न पूरक देखील आहेत. त्याच वेळी, आयुरक्षा किट, बालरक्षा किट आणि आयुष 64  (AYUSH-64) गोळ्या यांसारखी काही आयुषची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी उत्पादने ही विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.

औषधे 50 ते 90 टक्के कमी दरात उपलब्ध (Medicines available at lower rates)-

पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्रांवर उपलब्ध औषधांचा दर ब्रँडेड औषधांपेक्षा सुमारे 50 ते 90 टक्क्यांनी कमी आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात 893.56 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री झाली आहे. त्यामुळे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत नागरिकांची सुमारे 5 हजार 300 कोटी रुपयांची बचत झाली आहे.  या केंद्रांनी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 758.69 कोटी रुपयांची विक्री केली आहे. यामुळे नागरिकांची सुमारे 4 हजार 500 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

तुमच्या जिल्ह्यात जनऔषधी केंद्र कसे शोधाल (How to find Jan Aushadhi Centre)-

चांगल्या दर्जाची पण स्वस्त औषधे घेणयासाठी सरकारचे जन औषधी केंद्र नेमके आपल्या जिल्ह्यात किंवा परिसरात कुठे आहे हे माहिती करून घेण्यासाठी, http://janaushadhi.gov.in/KendraDetails.aspx या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथे सर्व केंद्रांचे लोकेशन उरलब्ध आहे. वेबसाइटवरील दिलेल्या कॉलममध्ये तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा आणि सर्च वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील सर्व जनऔषधी केंद्रांची यादी उघडेल. ज्यामध्ये सर्व औषध केंद्रांचा पत्ता, संपर्क क्रमांक दिलेले आहेत.