Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Medicine Rate: दैनंदिन वापरातील 'ही' औषधे मिळणार कमी दरात!

Medicine Price

Medicine Rate: NPPA यादीतील पॅरासिटामॉल, अमोक्सिसिलिन, राबेप्राझोल आणि मेटफॉर्मिनसह 127 औषधांचा समावेश यात करण्यात आला आहे.

Medicine Rate: 'नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी' (NPPA) ने 127 औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला असून या 127 औषधांना कॅपखाली स्थान देण्यात आले  आहे. याअंतर्गत दैनंदिन वापरातील काही औषधांच्या किमती (Rate) कमी केल्या जाणार आहेत. 'नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी' (NPPA) च्या या निर्णयामुळे पॅरासिटामॉलसारख्या अनेक औषधांच्या (Medicine) किमती कमी झाल्या आहेत. तर मेटफॉर्मिन आणि मॉन्टेलुकास्टसह इतर औषधांच्या किमती वाढल्या आहेत.

दैनंदिन वापरातील पॅरासिटामॉल, अमोक्सिसिलीनसह 127 औषधांच्या किमती कमी

दैनंदिन वापरातील व NPPA यादीतील 127 औषधांमध्ये पॅरासिटामॉल, अमोक्सिसिलिन, राबेप्राझोल आणि मेटफॉर्मिन यांचा समावेश करण्यात आला आहे. पॅरासिटामॉल 650 मिग्रॅ जी 2.3 रुपये प्रति टॅबलेट विकली जात होती ती आता 1.8 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. NPPA ने पॅरासिटामॉलच्या कॉम्बिनेशन फॉर्म्युलेशनमुळे (combination formulations) किमती कमी केल्या होत्या. अमोक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लेव्हुलेनेटची(amoxicillin and potassium clavulanate) किंमत देखील 22.3 रुपयांवरून 16.8 रुपये प्रति टॅब्लेट इतकी कमी करण्यात आली आहे.

मधुमेह टाईप 2 मध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या किंमती कमी

न्यूमोनियासारख्या जिवाणू संसर्गाशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या या औषधाची किंमत यावर्षी प्रथमच कमी करण्यात आली आहे. Moxifloxacin (400mg) ची किंमत देखील 31.6 रुपये प्रति टॅबलेटवरून 22.8 रुपये प्रति टॅबलेवर आली आहे. नवीन यादीमध्ये मेटफॉर्मिन (500mg) सारख्या काही औषधांची किंमत 1.7 रुपयांवरून 1.8 रुपये करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या आजारांवर वापरल्या जाणाऱ्या मेटफॉर्मिन(metformin) या औषधाच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. हे औषध मधुमेह टाईप 2 साठी वापरले जाते.

AIOCD चे सरचिटणीस काय म्हणाले?

'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स' (AIOCD) चे सरचिटणीस राजीव सिंघल यांच्या संभाषणानुसार पॅरासिटामॉल सारख्या काही औषधांच्या किमती आधीच सर्वात कमी आहेत. ओव्हर-द-काउंटर औषधांच्या (एपीआय) किमतीत कपात केल्यामुळे, दुकानदारांकडे कमी किमतीत औषधे विकण्यासाठी कमी पर्याय उरले आहे. औषधांच्या किमती कमी राहिल्यामुळे भविष्यात पुरवठ्यावर परिणाम होऊ नये इतकीच अपेक्षा आहे.

कधीपर्यंत नवीन किमतीची औषधे बाजारात येतील?

'बंगाल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन' (BCDA) चे सचिव सजल गांगुली यांच्या मते, नवीन किमतीची औषधे जानेवारीच्या अखेरीस मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होईल. 'सर्वसाधारणपणे नवीन किमतीची औषधे बाजारात यायला 1 महिना लागतो त्यामुळे पुढच्या महिन्याच्या अखेरीस नवीन स्टॉक उपलब्ध होईल.