Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maha RERA : घर खरेदी करणाऱ्यांसाठी 'रेरा'चा पुढाकार, मुदतीनुसार मिळणार प्रकल्पाची माहिती

Maha RERA : घर खरेदी करणाऱ्यांसाठी 'रेरा'चा पुढाकार, मुदतीनुसार मिळणार प्रकल्पाची माहिती

Maha RERA : घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महा रेरानं राज्यातल्या घर खरेदीदारांसाठी पुढाकार घेतलाय. महारेरातर्फे रिअल इस्टेट प्रकल्पांचं नियामक निरीक्षण सुरू केलं जाणार आहे. मुदतीनुसार घर आणि प्रकल्पाची सर्व माहिती घर खरेदीदारांना मिळणार आहे.

300पेक्षा जास्त प्रकल्पांना 'रेड फ्लॅग'

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अॅक्टतर्फे (Maha RERA) घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रिअल इस्टेट (Real estate) प्रकल्पांचं नियामक निरीक्षण हा त्याचाच एक भाग आहे. यानिमित्तानं पुढच्या काळात यासंदर्भातला व्यवहार पारदर्शक राहणार आहे. राज्यात एकूण 90,000 कोटींचे प्रकल्प वैध आहेत. मात्र या प्रकल्पांच्या सद्यस्थितीबद्दल कोणतीही माहिती किंवा अपडेट उपलब्ध नाही. त्यामुळे जवळपास 300पेक्षा जास्त प्रकल्पांना नियामकानं रेड फ्लॅग घोषित केले आहेत. हे रेड फ्लॅग त्यांच्या आर्थिक खर्च आणि प्रकल्पाच्या पूर्णतेनुसार करण्यात आले आहेत.

विकसकांना कारणे दाखवा नोटीस

नियमांचं पालन करणं आता प्रत्येक विकसकाला अनिवार्य आहे. नियमांचा भंग केल्यास नोटीस पाठवण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. मागच्या काही काळापासून नियामकानं तब्बल 16,000 विकसकांना नियमांचा भंग केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावल्या. प्रोजेक्ट स्टेटस, अनुपालन (कंप्लायन्स), नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन) अशा काही कारणास्तव या नोटीस विकसकांना नियामकानं धाडल्या आहेत.

...तरच रिअल इस्टेट एजंट म्हणून होणार नोंदणी

रिअल इस्टेट अधिक नियंत्रित होण्याच्या दृष्टीकोनातून रेरानं आणखी काही आश्वासक पावलं उचलली आहेत. राज्यातल्या रिअल इस्टेट एजंटांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. रेराच्या माध्यमातून प्रमाणित होण्यासाठीची ही परीक्षा असणार आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतरच एजंटाला त्याचा व्यवसाय प्रामाणिकपणे करता येणार आहे. म्हणजे रेराचं वैध पात्रता प्रमाणपत्र असणं एजंटला आवश्यक आहे. तरच रेराच्या (RERA) पोर्टलवर अधिकृत रिअल इस्टेट एजंट म्हणून नोंदणी करता येणार आहे.

एजंटांसाठी अभ्यासक्रम

प्रॉपर्टी एजंटला सर्व नियमांविषयी सखोल माहिती असायला हवी. त्या दृष्टीकोनातून रिअल इस्टेट एजंटसाठी मूलभूत रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षण आणि प्रमाणन अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मागच्या 2 वर्षांत रेरानं रिअल इस्टेट एजंटाना प्रशिक्षण देण्यासाठी एक अभ्यासक्रम विकसित केलाय. यासंदर्भात परीक्षा सुरळीत होण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन यांच्यासोबत सहकार्यदेखील केलंय.

महारेरातर्फे खबरदारी

महारेरामध्ये नोंदणी केलेल्या एजंटांना 1 सप्टेंबर 2023पर्यंत आपलं पात्रता प्रमाणपत्र मिळवावं लागणार आहे. हे सर्व काम महारेरातर्फे करण्याचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे घर खरेदी करणाऱ्यांना योग्य सेवा मिळायला हवी. एजंटांकडून कोणतीही चुकीची माहिती अथवा कोणताही असुरक्षित व्यवहार होऊ नये, याची खबरदारी रेरातर्फे घेतली जात आहे.