Union Budget Live 2023: 2023-24 अर्थसंकल्प लाईव्ह भाषण
अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेटमध्ये सविस्तर विश्लेषणासाठी प्रसिद्ध आहेत. मागची दोन वर्षं त्यांनी अडीच तासांच्या वर अर्थसंकल्पीय भाषण केलंय. यावेळी अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून नेमकं काय बाहेर पडतं याविषयी उत्सुकता आहे. कोव्हिड परिस्थितीतून देश आता सावरलाय असं काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या आर्थिक विश्लेषणापूर्वीच्या भाषणात म्हटलं होतं. पण, जागतिक स्तरावर अजूनही मंदीचं सावट आहे. रशिया - युक्रेन युद्धामुळे जागतिक स्थिती बिकट आहे. अशावेळी देशात महागाई वाढू नये यासाठी निर्मला सीतारामन यांना काही ठोस पावलं उचलावी लागतील. त्या दृष्टीने त्या काय निर्णय घेतात. हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी सरकारचं हे शेवटचं पूर्ण बजेट असेल. पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका आहेत. आपल्या शेवटच्या बजेटमध्ये मोदी सरकार लोकप्रिय घोषणा करतात की, आधीचं आर्थिक धोरण कायम ठेवतात याकडेही लक्ष असेल. निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषण ठिक सकाळी अकरा वाजता सुरू होईल.