Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023: मोदी 2.0 सरकारचे शेवटचे संपूर्ण बजेट; अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचा आजचा दिनक्रम

Union Budget 2023 Day Schedule

Union Budget 2023 Live: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (दि.1 फेब्रुवारी, 2023) सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट 2023 (Union Budget 2023-24) सादर करतील. त्यांचा आजचा दिनक्रम खालीलप्रमाणे असेल.

Union Budget 2023 Live: नरेंद्र मोद सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे मोदी सरकारचा 2.0 सरकारचे हे शेवटचे बजेट असणार आहे. कारण पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे मोदी सरकारचे हे शेवटचे संपूर्ण बजेट असणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे, इंडस्ट्रीचे आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या बजेटमधून टॅक्समधून सवलत मिळावी, अशी माफक अपेक्षा नोकरदारवर्गाची आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (दि.1 फेब्रुवारी, 2023) सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट 2023 (Union Budget 2023-24) सादर करतील. त्यांचा आजचा दिनक्रम खालीलप्रमाणे असेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सकाळचा कार्यक्रम

सकाळी 9:00 - अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्रालयातल्या कार्यालयात पोहोचतील.

सकाळी 9:20 - सीतारामन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेणार

सकाळी 9:30 - राष्ट्रपतींची बजेटच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी

सकाळी 9:45 - सीतारामन संसदेकडे रवाना होणार

सकाळी 10:00 - संसदेच्या आवारात आपल्या टीमबरोबर दाखल होणार. मंत्रिमंडळातील सहकारी आणि अर्थमंत्रालयातल्या अधिकाऱ्यांबरोबर फोटो

सकाळी 10:15 - मंत्रिमंडळाच्या बैठकीत बजेटसमोर ठेवलं जाणार

सकाळी 10:30 - संसदेच्या मुख्य सभागृहात दाखल

सकाळी 11:00 - लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनात बजेट सादर

दुपारी 3:00 - संसदेतल्या सादरीकरणानंतर अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत बजेटविषयी पत्रकार परिषद

महागाईमुळे कुटुंबाचे बजेट कोलमडले असून बचत आणि गुंतवणुकीसाठी पैसा शिल्लक राहत नसल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे बजेट अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.