Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning:आर्थिक नियोजनाबाबत असलेले 'हे' 4 गैरसमज समजून घ्या!

Financial Planning

Financial Planning: आर्थिक नियोजनाच्या बाबतीत अनेकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. अपुऱ्या किंवा ठोस माहितीच्या अभावामुळे ते आर्थिक नियोजनाला हवे तेवढे महत्त्व देताना दिसत नाहीत. परिणामी आर्थिक नियोजनामुळे होणाऱ्या फायद्याचा आनंद त्यांना घेता येत नाही.

आर्थिक नियोजनाचा जेव्हाजेव्हा विचार केला जातो; तेव्हा बहुतांश जणांना चुकीची किंवा वेगवेगळ्या स्कीमची माहिती दिली जाते. या अशा चुकीच्या माहितीमुळे बरेच जण आर्थिक क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये गुंतवणूक करण्यास किंवा त्याचे आर्थिक नियोजन (Financial Planning) करायला घाबरतात. असे होऊ नये म्हणून, वेळीच ते गैरसमज दूर होणे गरजचे आहे. काही नागरिकांना असे वाटते की, त्यांना आर्थिक नियोजनाच्या सेवांची गरज नाही, तर इतरांना वाटते की, त्यांचे उत्पन्न आर्थिक नियोजनासाठी अपुरे आहे. परिस्थिती कशीही असो पण अजूनही नागरिकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. ज्ञानाच्या अभावामुळे लोक सहसा आर्थिक नियोजनाला हवे तेवढे महत्त्व देत नाहीत. त्यामुळेच, आर्थिक नियोजन केल्याने होणाऱ्या फायद्याचा आनंद त्यांना घेता येत नाही.

आर्थिक सल्लागार म्हणजे कोण?

आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक नियोजक  म्हणजे अशी व्यक्ती जी ग्राहकांना त्यांचे पैसे व्यवस्थापित करण्यात आणि त्यांची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यात मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करते.

आर्थिक नियोजन आणि आर्थिक नियोजक यांच्या बाबत परंपरागत चालत आलेले असे कोणते गैरसमज आहेत; जे आपण टाळले पाहिजेत, याची माहिती जाणून घेऊया.

आर्थिक नियोजन फक्त श्रीमंतच करतात 

आर्थिक नियोजन हे फक्त श्रीमंतांसाठी असते असे बऱ्याच जणांना वाटते. पण मुळात ही गोष्ट चुकीची आहे. पैशाने श्रीमंत असणारे नागरिक मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवतात आणि राखून ठेवतात. त्याच पद्धतीने संपत्तीची संख्या कितीही असली तरीही, गरजांचे योग्य नियोजन करून ती राखून ठेवता येते. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्याची सुरुवात तरुण वयापासूनही करता येते. म्हणूनच, आर्थिक नियोजन करायला जितक्या लवकर प्रारंभ कराल तितके नफ्याचे ठरेल.


आर्थिक नियोजनासाठी भरपूर फी आकारतात

काही जणांना असे वाटते की, आर्थिक नियोजन करणाऱ्यांची (Financial Consultant) फी खूप जास्त असते. त्यातील सत्य असे आहे की, आर्थिक नियोजन करणाऱ्यांची मदत घेतल्यास पैशांचे ओझे वाटण्याऐवजी खर्चात लक्षणीय बचत होऊ शकते. याव्यतिरिक्त, आर्थिक सल्लागार त्यांच्या कामाच्या बाबतीत मनमोकळेपणे मदतीसाठी तत्पर असतात. तुम्ही देत असलेल्या फीच्या बदल्यात तुम्हाला मिळणारे फायदे जास्त असतात. मिळणाऱ्या सेवा आणि भविष्याच्या दृष्टीने विचार केला असता, आर्थिक नियोजक तुम्हाला महाग वाटणार नाहीत.

आर्थिक नियोजनासाठी वय कमी आहे

कमी पैसे कमावत असल्यामुळे किंवा कमी मालमत्ता असल्यामुळे तरुणाईला आर्थिक नियोजन करणे निरर्थक वाटू शकते. परंतु, वेळेपूर्वी नियोजन करून आर्थिक सवयी लावून घेतल्या तर भविष्यात एक मजबूत पाया तयार करण्यासाठी मदत होऊ शकते.जितक्या लवकर आर्थिक निर्णय घेणे सुरू कराल तितक्या लवकर तुम्ही तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या जवळ जाऊ शकता. तरुणांनी गुंतवलेले पैसे वाढण्यास अधिक वेळ मिळेल, ज्यामुळे त्यांना भविष्यात गुंतवणुकीसाठी लागणारी रक्कम कमी होऊ शकते. म्हणूनच, वयाच्या दृष्टीने विचार न करता गुंतवणूक कशी होऊ शकेल, हा विचार उपयोगी ठरू शकतो.

आर्थिक नियोजनासाठी वेळ खर्ची होतो

आर्थिक नियोजनाला बराच वेळ लागू शकतो हे खरे असले तरी नेहमीच असे होत नाही. याआधी, आर्थिक सल्लागारासह मीटिंग ठरवणे, त्यांचा वेळ घेऊन चर्चा करणे, योजना तयार करून पुन्हा भेट घेणे या गोष्टींमध्ये बराच वेळ खर्ची लागत होता.परंतु, आता तंत्रज्ञानाच्या विविध सुविधांमुळे आर्थिक योजना मिळविण्यासाठी काही दिवस किंवा आठवडे वाट पाहण्याची आवश्यकता भासत नाही.