Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Lending : क्रिप्टो लेन्डिंग म्हणजे काय? जाणून घ्या क्रिप्टो कर्जाची संपूर्ण प्रक्रिया!

Crypto Lending

Crypto Lending : गुंतवणूकदाराच्या वॉलेटमधील क्रिप्टो ठराविक इंटरेस्ट रेटच्या बदल्यात कर्जाने देता येतात. त्याबदल्यात त्या गुंतवणूकदाराला दर आठवड्याला किंवा प्रत्येक महिन्याला 3 ते 17 टक्क्यांपर्यंत क्रिप्टोरुपात व्याज मिळते.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment) करताना आपण काही ठराविक शेअर्ससोबत दररोज खेळतो तर काही शेअर्स लॉन्गटर्मसाठी होल्ड करून ठेवतो. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्येही अनेक गुंतवणूकदार अशा सोप्या स्ट्रॅटेजीचा वापर करतात. खासकरून क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील अस्थिरतेपासून (Volatility) आणि त्यामुळे येणाऱ्या टेन्शनपासून चार हाथ लांब राहण्यासाठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) 2-3 वर्षांसाठी होल्ड करून ठेवतात. परिणामी, क्रिप्टोकरन्सी बराच काळ गुंतवणूकादाराच्या अकाउंटमध्ये पडून राहतात. ना त्याची ट्रेडिंग होते किंवा त्या विकल्याही जात नाहीत. जोपर्यंत आपल्याला हवी तेवढी किंमत मिळत नाही. तोपर्यंत ती क्रिप्टोवॉलेटमध्ये तशीच पडून असते. लॉन्ग टर्म गुंतवणूक करणारे सरसकट असेच करतात. पण जोपर्यंत त्या क्रिप्टोकरन्सीचा भाव आपण ठरवलेल्या किमतीवर येत नाही तोपर्यंत काय? दोन-तीन वर्षे ही गुंतवणूक अशीच ठेवायची! यामुळे आपली मुद्दल रक्कम अडकून राहते, त्याचे काय? तुम्ही देखील असाच विचार करत असाल तर मग हा लेख खास तुमच्या साठी आहे. तुमच्या या पडून राहिलेल्या क्रिप्टोचा योग्य वापर करण्यासाठी आणि त्यातून तुम्हाला चांगला फायदा मिळवून देण्यासाठी क्रिप्टो लेन्डिंगचा (Crypto Lending) वापरता करता येईल. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे क्रिप्टो लेन्डिंग.

क्रिप्टो लेन्डिंग म्हणजे काय? What is Crypto Lending?

क्रिप्टोकरन्सी लेन्डिंग याचा साधासोपा अर्थ म्हणजे तुमच्या क्रिप्टोकरन्सी कर्ज स्वरूपात देणे आणि त्याबदल्यात त्यावर व्याज मिळवणे. हे व्याज क्रिप्टोच्या स्वरूपातच मिळते. व्याज म्हणून मिळणाऱ्या या क्रिप्टोला क्रिप्टो डिविडेंड (Crypto Dividend) असे म्हटले जाते. क्रिप्टो लेन्डिंगमध्ये व्याज हे क्रिप्टोकरन्सी स्वरूपातच असते. क्रिप्टो लेन्डिंगमुळे अकाउंटमध्ये होल्ड केलेल्या क्रिप्टोकरन्सीचा वापर करता येऊ शकतो. क्रिप्टो लेन्डिंग हे आपण सेव्हिंग अकाउंटमध्ये जसे पैसे ठेवतो; काहीसे तसेच आहे. यामध्ये दोन जणांचा समावेश असतो. एक म्हणजे लेंडर (Lender) म्हणजे जो क्रिप्टोकरन्सी देऊन क्रिप्टो व्याज घेतो आणि दुसरा बॉरोर्व्हर (Borrower)  जो क्रिप्टोकरन्सी घेऊन त्यावर क्रिप्टो व्याज देतो. लेंडर आणि बॉरोर्व्हर हे दोघेही या प्रक्रियेसाठी क्रिप्टो लेन्डिंगचा वापर करतात. 


क्रिप्टो लेन्डिंग काम कसे करते? How Crypto Lending Works?

क्रिप्टो लेन्डिंग कसे काम करते हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. एखाद्याकडे 20 बिटकॉईन्स आहेत. त्याला ते बिटकॉईन (Bitcoin) पुढच्या 5 वर्षांपर्यंत विकायचे नाहीत. पण त्याला त्या 20 बिटकॉईन्समधून इन्कमसुद्धा हवे आहे. त्यामुळे तो एका थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मकडे जातो. जो त्याला क्रिप्टो लेन्डिंगची सुविधा पुरवू शकतो. तसेच ती व्यक्ती त्याच्यासाठी बिझनेससुद्धा शोधते. त्याच्याकडचे ते 20 बिटकॉईन्स तो ठराविक इंटरेस्ट रेटच्या बदल्यात क्रिप्टो लेन्डिंगला देतो व त्याबदल्यात ते त्याला दर आठवड्याला किंवा प्रत्येक महिन्याला 3 ते 17 टक्क्यांपर्यंत क्रिप्टो व्याज देतात. ज्याप्रमाणे लेंडर म्हणजेच तो गुंतवणूकदार क्रिप्टो लेन्डिंग प्लॅटफॉर्मकडे बिटकॉईन्स घेऊन जातो. त्याचप्रमाणे बॉरोर्व्हर म्हणजेच ज्यांना फंडस् हवे आहेत. ते प्लॅटफॉर्मकडे त्यांची क्रिप्टो कर्जाची मागणी घेऊन येतात. कर्ज काढताना काहीतरी ठेवावे लागते त्याप्रमाणे बॉरोर्व्हर त्याच्याकडच्या क्रिप्टो कॉलॅटरल स्वरूपात प्लॅटफॉर्मकडे गहाम ठेवतात. जोपर्यंत बॉरोर्व्हर घेतलेले सर्व फंडस् व्याजासकट परत करत नाही. तोपर्यंत त्याला त्याच्या क्रिप्टोकरन्सी परत दिल्या जात नाहीत. प्रत्येक क्रिप्टो लेन्डिंग प्लॅटफॉर्ममध्ये थोडा फार फरक असतो. परंतु ओव्हरऑल प्रोसेस सगळीकडे समानच असते. 

क्रिप्टो लेन्डिंगचे फायदे व तोटे! Advantage & Disadvantage of Crypto Lending!

सर्वसाधारण बँकेच्या कर्जापेक्षा क्रिप्टो लेन्डिंगमध्ये जास्त फायदे नक्कीच आहेत, असे म्हणता येईल. क्रिप्टो लेन्डिंगमध्ये कर्ज घेताना कोणत्याही प्रकारची क्रेडिट चेकिंग होत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तींना बँक कर्ज देण्यापासून नाकारते ते देखील क्रिप्टो लेन्डिंगद्वारे कर्ज घेऊ शकतात. बॉरोर्व्हरला मिळणारे कर्ज हे बँकेच्या इंटरेस्ट रेटपेक्षा कमी रेटमध्ये मिळू शकते. क्रिप्टो लेंडर्स सामान्य सेव्हिंग्स अकाउंटमधून येणाऱ्या व्याजापेक्षा जास्त इन्कम क्रिप्टो लेन्डिंगमधून घेऊ शकतात.

क्रिप्टो लेन्डिंगचे जसे फायदे आहेत; तसेच त्याचे काही तोटे देखील आहेत. अनेकवेळा लेंडर कॉलॅटरल स्वीकारताना कमी मूल्य स्वीकारतात. ज्यामुळे त्यांचे पारडे जड तर दिसते. पण भविष्यात तोटा सहन करायला लागतो. बँक आपण ठेवलेल्या पैशांची हमी घेते व त्यावर सरकारी इन्शुरन्स देखील आपल्याला मिळतो. परंतु क्रिप्टोकरन्सी विकेंद्रित असल्याने यामध्ये तुमच्या क्रिप्टोकरन्सीची हमी कोणीही घेत नाही. क्रिप्टोकरन्सीची किंमत ढासळल्यावर तर अजूनच परिस्थिती बिकट होऊ शकते.

क्रिप्टोकरन्सी कर्ज घ्यायचे आणि द्यायचे कसे? How to borrow and lend cryptocurrency?

क्रिप्टोकरन्सीवर कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम योग्य प्लॅटफॉर्म निवडणे गरजेचे आहे. यात प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता खूप महत्त्वाची आहे. त्याची संपूर्ण माहिती घेऊनच क्रिप्टो कर्जासाठी प्रयत्न करावेत. प्लॅटफॉर्म ठरल्यानंतर कोणत्या प्रकारचे क्रिप्टो तुम्ही घेणार आहात हे शोधावे. प्रत्येक प्लॅटफॉर्म सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीज उपलब्ध करून देत नाहीत. त्यानंतर ठरवलेल्या क्रिप्टोकरन्सीवर वार्षिक रिटर्न्स किती आहे याची माहिती घ्यावी. क्रिप्टो लेन्डिंगमध्ये आपण जेवढे कॉलॅटरल ठेवतो त्यावर लोन-टू-व्हॅल्यू रेशोने कर्ज ठरवले जाते. लोन-टू-व्हॅल्यू रेशो 50 टक्क्यांपर्यंत असतो. जर तुमचे 1 हजार डॉलर्सचे कॉलॅटरल असतील तर तुम्हाला 5 हजार डॉलर्सचे कर्ज मिळू शकते.

अशाच पद्धतीने क्रिप्टोकरन्सी कर्ज दिले जाते. अगदी आपण जसे बचत खात्यात पैसे ठेवतो आणि त्यावर बॅंकेकडून व्याज मिळवतो. अगदी त्याचप्रमाणे इथेही क्रिप्टोकरन्सी गहाण ठेवून त्यावर व्याज मिळवायचे असते. क्रिप्टोकरन्सी ठेवण्यासाठी सर्वप्रथम एक योग्य प्लॅटफॉर्म निवडणे गरजेचे आहे. 

जर तुमच्याही क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये (Crypto Wallet) अशाच पडून राहिल्या असतील तर तुम्ही सुद्धा त्या कर्जाने देऊन त्यावर क्रिप्टोस्वरूपात व्याज मिळवू शकता. एकंदरीत क्रिप्टोमार्केट बूम होण्याची वाट पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्या क्रिप्टोकरन्सी कर्ज रूपात देऊन निदान आणखी क्रिप्टोतरी मिळवता येतील.