क्रिप्टो (Crypto) म्हटलं की सुरक्षितता हा पहिला प्रश्न सर्वांच्याच मनात येतो. क्रिप्टो संपूर्ण जगात मोठ्या वेगाने वाढणारे आधुनिक चलन जरी असले तरी त्यामध्ये सुरक्षितता हा मोठा प्रश्न आहे. हाच प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर अनेक उपाय केले जातात. याच अनेक उपायांपैकी एक म्हणजे क्रिप्टो वॉलेट (Crypto Wallet). क्रिप्टो वॉलेट तुमच्या क्रिप्टोकरन्सी सुरक्षित ठेवतात. चला तर मग जाणून घेऊयात क्रिप्टो वॉलेट म्हणजे काय? What is Crypto Wallet?
क्रिप्टो वॉलेट्स म्हणजे काय? हे समजून घेण्याआधी क्रिप्टो की (Crypto keys) म्हणजे काय? त्यात प्रायव्हेट की (Private Key) म्हणजे काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही क्रिप्टोकरन्सी विकत घेता. तेव्हा तुम्हाला दोन प्रकारच्या कीज् (Keys) दिल्या जातात. एक प्रायव्हेट की (Private Key) आणि दुसरी पब्लिक की (Public Key). पब्लिक की आपल्या ई-मेल प्रमाणेच काम करते. या कीज् शेअर केल्यामुळे फंडसची देवाण घेवाण करणं शक्य होते. तर प्रायव्हेट की हे अक्षरे आणि संख्यांची स्ट्रिंगस् असतात. जे इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर केले जात नाहीत. सोप्या भाषेत Keys आपल्या वरच्युअल अकाउंट्सचा पासवर्ड असतात. ज्यामध्ये आपले पैसे ठेवलेले असतात. जोपर्यंत तुम्हाच्या या प्रायव्हेट कीज् केवळ तुम्हालाच माहित आहेत व त्यांचा ऍक्सेस केवळ तुमच्याकडेच आहे; तोपर्यंत तुमचे वरच्युअल अकाउंट सुरक्षित आहे व जगात कुठूनही इंटरनेट कनेक्शनद्वारे तुम्ही या अकाउंटमधून क्रिप्टोची देवाण घेवाण करू शकता.
Table of contents [Show]
क्रिप्टो वॉलेट म्हणजे काय? What is Crypto Wallet?
क्रिप्टोकरन्सी व्यवहारांसाठी लागणारी व सर्वात महत्त्वाची असणारी ही प्रायवेट की (Private Key) सुरक्षित ठेवण्यासाठी क्रिप्टो वॉलेट्सचा वापर केला जातो. या वॉलेट्समध्ये Keys ठेवल्याने त्या अधिक सुरक्षित राहतात व क्रिप्टोकरन्सी व्यवहार करणे सोपे होते. क्रिप्टो वॉलेट्स खातेवही (Ledger) सारखे हार्डवेअर वॉलेटही असू शकते किंवा मोबाईल अॅपसुद्धा असू शकते. ज्यामुळे व्यवहार अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होतात.
क्रिप्टो वॉलेट्स महत्त्वाचे का आहेत?
आपल्या सामान्य वॉलेट्समध्ये आपण ज्या प्रमाणे पैसे व कार्ड्स ठेवतो. त्याप्रमाणे क्रिप्टो वॉलेट्समध्ये क्रिप्टोकरन्सी ठेवली जात नाही. क्रिप्टोकरन्सीमधील तुमचे होल्डिंग्स ब्लॉकचेन वर साठवलेले असतात व त्यांचा अॅक्सेस प्रायवेट Keysच्या मदतीने घेतला जाऊ शकतो. तुमच्या डिजिटल मालमत्तेची चावी म्हणजे ही प्रायवेट की (Private Keys) होय. जर तुमच्याकडून ही प्रायवेट हरवली, तर तुमच्या अकाउंटमधल्या पैशांचा अॅक्सेस देखील तुम्हाला गमवावा लागतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे या कीज् भरपूर महत्त्वाच्या असतात. जेवढी ही प्रायवेट की महत्त्वाची असते तेवढीच त्याची सुरक्षितता देखील महत्त्वाची असते. प्रायवेट कीज् सुरक्षित ठेवण्यासाठी क्रिप्टो वॉलेट्सचा वापर केला जातो. त्यामुळे जेवढे महत्त्व प्रायवेट कीजचे असते; तेवढेच महत्त्व या क्रिप्टो वॉलेट्सचे देखील असते.
क्रिप्टो वॉलेट्सचे प्रकार Types of Crypto Wallets
पेपर वॉलेट्स (Paper Wallets)
प्रायवेट कीज या अक्षरे आणि संख्यांची स्ट्रिंग असतात. ज्या एका कागदावर लिहून एका सुरक्षित ठिकाणी तो कागद ठेवला जातो. यालाच पेपर वॉलेट असे म्हटले जाते. क्रिप्टो व्यवहार डिजिटल असल्याने पेपर वॉलेट्सचा वापर करताना व्यवहार करणे अवघड होऊन जाते.
हार्डवेअर वॉलेट्स (Hardware Wallets)
हार्डवेअर वॉलेट्समध्ये प्रायवेट कीज् या थंब-ड्राईव्ह (Thumb Drive) डिव्हाइसेसमध्ये साठवून ती ड्राईव्ह सुरक्षित ठेवली जाते. जी केवळ एका कॉम्पुटरला कनेक्टेड असते.
ऑनलाईन वॉलेट्स (Online Wallets)
ऑनलाईन वॉलेट्समध्ये प्रायवेट कीज् एका सॉफ्टवेअरमध्ये किंवा मोबाईल अॅपमध्ये ठेवल्या जातात. यामुळे तुमची क्रिप्टोकरन्सी पाठवणे, मिळवणे आणि त्याचा वापर करणे, हे कोणतेही ऑनलाईन बँक खाते वापरण्याइतके सोपे होते. ऑनलाईन वॉलेट्स निवडताना असे वॉलेट निवडा; ज्यामध्ये टू-स्टेप एन्क्रिप्शन (Two-step encryption) सुविधा असेल. ज्यामुळे तुमचे वॉलेट अजून सुरक्षित होईल.
क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये हॅकर्स लहान-सहान चुकांची जणू काही वाटच पाहत असतात. त्यामुळे आपल्या पैशांच्या सुरक्षिततेची जेवढी जबाबदारी क्रिप्टो एक्सचेंजेसची असते, तेवढीच ती आपली सुद्धा असते. त्यामुळे क्रिप्टोमध्ये प्रत्येक स्तरावर सुरक्षितता बाळगणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या कीज् सुरक्षित ठेवताय तर, त्या किती सुरक्षित आहेत हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा. क्रिप्टो वॉलेट्स महत्त्वाचे असून ते आपल्या सोईनुसार निवडावे. हार्डवेअर वॉलेट असो किंवा ऑनलाईन वॉलेट असो, सुरक्षिततेची पक्की तपासणी करूनच वॉलेट निवडा! कारण प्रश्न आपल्या पैशांचा आहे.