गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी बँकांचे शेअर्स चांगली कामागिरी करत आहेत. पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक यांच्या शेअर्सनी चांगले रिटर्न दिले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे.
UCO Bank Share देखील चांगली कामागिरी करताना दिसत आहे. UCO ही एक सरकारी बँक आहे. या बँकेने आठवडा, महिना, वर्ष अशा सर्वच कालावधीचा विचार करता चांगला परतावा दिला आहे. शुक्रवारी बाजार बंद होतानाही या शेअरची चांगली कामागिरी दिसून आली.
शुक्रवारी बाजार बंद होताना या शेअर्सचा भाव 36.40 इतका होता. आदल्या दिवशीपेक्षा 2.25 टक्के इतकी वाढ या शेअर्सने नोंदवली आहे. 0.80 रुपये इतकी UCO Bank Share ची किंमत वाढली.
आठवड्याभरात या शेअरने 24.10 वरून पुढे 12.30 रुपयांची झेप घेतली. आठवड्यातभरातील ही वाढ 50.72 टक्के इतकी आहे. गेल्या महिनाभरातही या बँकेने 152.07 टक्के इतकी घसघशीत वाढ नोंदवली आहे. 22.05 रुपये इतकी वाढ या कालावधीत झाली आहे. 1 वर्ष इतक्या कालावधीचा विचार केला तर 171.75 टक्के इतकी ही वाढ आहे. वर्षभरापूर्वी 13. 30 रुपयावर असणारा हा शेअर आता 36.40 पर्यंत पोचला आहे.शुक्रवारी दिवसभरात 34.80 हा नीच्चांक तर 38.15 हा उच्चांक गाठला होता. 52 आठवड्यात 10.55 नीच्चांक तर 38.15 हा उच्चांक राहिला आहे.
UCO Share Price वाढीचे 'हें' आहे कारण
एखाद्या शेअर्ससंबंधी येणाऱ्या बातम्या त्या शेअर्सच्या किंमतीत चढ-उतार घडवून आणताना दिसतात. तिमाही कामागिरीचे आकडेही बाहेर येतं असतात. ते ही शेअर्सच्या किंमतीवर परिणाम करत असतात. UCO बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत ठीक कामागिरी केली आहे. या तिमाहीच्या निकालानुसार UCO बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात 1769.60 कोटी रुपयांची वाढ़ झालेली दिसून आली.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)