• 27 Mar, 2023 06:41

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Suisse Bank Crises: युरोप मंदीच्या कचाट्यात! स्वित्झर्लंडमधील क्रेडिट स्वीस बँक आर्थिक अडचणीत

Credit Suisse Bank

Image Source : www.six-group.com

Credit Suisse Bank Crises: क्रेडिट स्वीसचा डोलारा कोसळण्याचे संकेत मिळताच जगभरातील बड्या गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. गुरुवारी 15 मार्च 2023 रोजी अमेरिका, युरोप आणि आशियातील शेअर निर्देशांकांत 2% ते 4% घसरण झाली. कमॉडिटी मार्केटमध्ये क्रूडचा भाव गडगडला तर दुसऱ्या बाजूला सोने भावात तेजी दिसून आली.

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक डबघाईला आल्यानंतर आठवडाभरातच युरोपातील बँका मंदीच्या कचाट्यात सापडल्या आहेत. जागतिक पातळीवर मोठी इन्व्हेस्टमेंट बँक अशी ओळख असलेली स्वित्झर्लंडमधील क्रेडिट स्वीस बँकेची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्रेडिट स्वीसचा डोलारा कोसळण्याचे संकेत मिळताच जगभरातील बड्या गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. गुरुवारी 15 मार्च 2023 रोजी अमेरिका, युरोप आणि आशियातील शेअर निर्देशांकांत 2% ते 4% घसरण झाली. कमॉडिटी मार्केटमध्ये क्रूडचा भाव गडगडला तर दुसऱ्या बाजूला सोने भावात तेजी दिसून आली. गुंतवणूकादारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी क्रेडिट स्वीस व्यवस्थापनाने तातडीने 54 बिलियन डॉलर्सचे कर्ज काढून रोखीची चणचण दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. (Credit Suisse Bank faces financial crises decide to borrow usd 54 billion loan) 

गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अचानक बंद झाली होती. त्यापाठोपाठ सिग्नेचर बँक देखील अमेरिकन बँकिंग रेग्युलेटरने तडकाफडकी बंद केली होती. यामुळे अमेरिकेतील बँकांना रोजचा व्यवसाय करणे मुश्किल झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील बँकांवरचे मंदीचे लोण आता युरोपात पसरले आहे. आर्थिक संकट वाढल्यानंतर फेडरल रिझर्व्ह आणि युरोपीय सेंट्रल बँक अलर्ट मोडवर आहेत.

क्रेडिट स्वीसला भक्कम पाठबळ देणाऱ्या सौदी नॅशनल बँक या बड्या गुंतवणूकदाराने  यापुढे अर्थ सहाय्य करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये उमटले. यातून क्रेडीट स्वीसची आर्थिक स्थिती खूपच खालावली असल्याचे बोलले जात आहे. क्रेडीट स्वीसने गुरुवारी आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याचे जाहीर केले.

दरम्यान, दैनंदिन व्यवसायासाठी आवश्यक रोकड चणचण दूर करण्यासाठी स्वीस नॅशनल बँकेकडून 50 बिलियन स्वीस फ्रॅंक (54 बिलियन डॉलर्स) कर्ज घेण्याचा पर्याय विचार करत असल्याचे  क्रेडिट स्वीसने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याला स्वीस नॅशनल बँकेने दुजोरा दिला आहे. बँकिंग क्षेत्रातील महत्वाच्या बँकांना तातडीने अतिरिक्त अर्थसहाय्य (बेलआऊट) करण्यास तयार असल्याचे स्वीस नॅशनल बँकेने म्हटले आहे.

क्रेडिट स्वीस का अडचणीत आलीय? (Why Credit Suisse In Trouble)  

 • वर्ष 2022 मध्ये क्रेडिट स्वीसला 7.4 बिलियन स्वीस फ्रॅंकचा (7.8 बिलियन डॉलर्स) तोटा झाला.
 • ठेवीदार, फंड्स, ट्रस्ट यांनी क्रेडीट स्वीसमधून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला.
 • मागील सहा ते आठ महिन्यांपासून  क्रेडिट स्वीसची आर्थिक परिस्थिती खालावल्याचे बोलले जाते.
 • यानंतर क्रेडिट स्वीसमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार सौदी नॅशनल बँकेचा क्रेडीट स्वीसला आणखी सपोर्ट करण्याबाबत नकार 
 • नोव्हेंबर 2022 मध्ये क्रेडीट स्वीसने निधी उभारणी केली होती त्यात सौदी नॅशनल बँकेने काही हिस्सा खरेदी केला
 • क्रेडीट स्वीसच्या फेररचनेबाबत सौदी नॅशनल बँक आग्रही, सौदी नॅशनल बँकेचा क्रेडीट स्वीसमध्ये 9.8% हिस्सा 
 • अमेरिका आणि युरोपातील बँकांकडून व्याजदर वाढीचे अर्थव्यवस्थेवर पडसाद
 • बँकांच्या चढ्या व्याजदरांमुळे उद्योग आणि कर्जदारांच्या कर्जफेडीवर परिणाम
 • बँकांना रोकड टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक बड्या बँकांना व्यवसाय करणे जिकरीचे बनले
 • या बँकांमधील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झालाय
 • बड्या इन्व्हेस्टर्सकडून आर्थिकदृष्ट्या कमकुवत  होणाऱ्या बँकांचा सपोर्ट काढण्याच्या हालचाली
 • सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या अमेरिकेतील दोन बँका तडकाफडकी बंद
 • बँकिंग क्षेत्रावर फेडलर रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक, स्वीस नॅशनल बँक आणि यूएस ट्रेझरी या संस्थांचे विशेष लक्ष

क्रेडीट स्वीसचा शेअर कोसळला (Shares of Credit Suisse Fall)

credit-suies-graphic.jpg

जागतिक पातळीवरी 30 बड्या बँकांपैकी एक असलेल्या  क्रेडीट स्वीस बँकेची आर्थिक परिस्थिती खालावल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेप्रमाणेच क्रेडीट स्वीस बँकेला रोजचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी कर्ज काढण्याची नामुष्की ओढवली आहे. याचा फटका क्रेडीट स्वीसच्या शेअर्सला बसला आहे. क्रेडीट स्वीसचा शेअर गुरुवारी 15 मार्च 2023 रोजी इंट्रा डेमध्ये 30% कोसळला. स्वीस स्टॉक एक्सचेंजवर क्रेडीट स्वीसचा शेअर 1.55 स्वीस फ्रॅंक या सार्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला होता. या पडझडीने गुंतवणूदारांचे प्रचंड नुकसान झाले. याची झळ अमेरिका आणि युरोपातील बड्या बँकांच्या शेअर्सला बसली. डॉईश बँकेचा शेअर 6.8% ने घसरला. वेल्स फार्गोचा शेअर 3% , गोल्डमन सॅक्स, जे.पी मॉर्गनचा शेअर 4.7%  आणि सिटी बँकेचा शेअर 5.4%  ने घसरला. फर्स्ट रिपब्लिक या बँकेचा शेअर 21% कोसळला आहे. पॅकवेस्ट बॅंककॉर्प, वेस्टर्न अलायन्स या बँकांचे शेअर 10%  हून अधिक कोसळले.

(News Source : CNBC News, NDTV, Reuters)