Twitter Verified Accounts Features : तुम्ही देखील ट्विटर(Twitter) वापरता का? जर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ट्विटरने(Twitter) आपला अद्यतनित खाते(Account) पडताळणी कार्यक्रम सुरू केला असून या अंतर्गत आता व्हेरिफाईड अकाउंटकरिता(Verified Account) तीन रंगांचा वापर केला जाणार आहे. या पडताळणी कार्यक्रमा अंतर्गत आता व्हेरिफाईड अकाउंटकरिता तीन वेगवेगळे रंग वापरले जाणार आहेत. हे रंग वेगवेगळ्या श्रेणीच्या आधारावर विभागले जातील. कोणाला कोणत्या रंगाच्या टिक्स मिळतील आणि कोणता रंग कोणासाठी वापरला जाईल हे चला तर जाणून घेऊयात.
कोणत्या रंगाची टिक कोणासाठी?
ट्विटर(Twitter) कंपनीनेचे नवीन सीईओ इलॉन मस्क यांनी हे नवीन फीचर लॉन्च करताना सांगितले की, यापुढे व्हेरिफाईड खाती(Verified Account) तीन श्रेणी आधारित विभागली जाणार आहेत आणि त्यानुसार त्यांचा रंगही ठरवण्यात आला आहे. गोल्ड(Gold) रंगाची व्हेरिफाईड टिक ही कंपन्यांसाठी असणार आहे.
शासकीय संस्था किंवा सरकारी खात्याशी संबंधित राखाडी(Gray) रंगाची टिक उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासोबतच निळ्या(Blue) रंगाची टिक सर्वसामान्य व्यक्तींसाठी उपलब्ध असेल. तथापि, मस्क यांनी स्पष्ट केले आहे की सत्यापित खाते मॅन्युअली प्रमाणीकृत केले जाईल.
या प्रक्रियेत काही कमतरता आढळल्यास खात्याची पडताळणी केली जाणार नाही. यासोबतच नोटेबल(Notable) आणि ऑफिशियल(Official) असे वेगवेगळे टॅग(Tag) मर्यादित असल्याने ते प्रत्येकाला दिले जाणार नाही.