Twitter ने पुन्हा एकदा ट्रस्ट आणि सेफ्टी टीमशी संबंधित युनिटमध्ये कर्मचारी कपात केली आहे. यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.
Twittwr ने यापूर्वी मोठ्या प्रमाणात Layoff केली होती. आता ट्विटरमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्यात आली आहे. कंपनीने पुन्हा एकदा ट्रस्ट आणि सेफ्टी टीमशी संबंधित युनिटमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे जी ग्लोबल कंटेंट मॉडरेशन हाताळते. कंपनीच्या डब्लिन आणि सिंगापूर कार्यालयातील कामगारांना शुक्रवारी रात्री कामावरून कमी करण्यात आले. 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ अधिकार्यांचाही समावेश आहे. यामध्ये नूर अझहर बिन अय्युब आणि अॅनालुइस डोमिंग्वेझ असे दोन अधिकारी आहेत.
नूर अझहर बिन अय्युब हे आशिया-पॅसिफिक क्षेत्रासाठी महत्वाचे अधिकारी आहेत. तसेच, अॅनालुइस डोमिंग्वेझ हे ट्विटरचे महसूल धोरणाचे वरिष्ठ संचालक आहेत. या दोन महत्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांनाही या निर्णयाचा फटका बसला आहे.
Twitter ने जारी केले एक निवेदन
ट्विटरवर असे एम्प्लॉयी जे ग्लोबल अपील आणि राज्य माध्यमांवरील धोरण संबंधित काम पाहत होते. त्यांना देखील काढून टाकण्यात आले, असे अहवालात म्हटले आहे. Twittwr च्या ट्रस्ट आणि सेफ्टी च्या उपाध्यक्ष एला इर्विन यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, की ट्विटरने शुक्रवारी रात्री ट्रस्ट आणि सेफ्टी टीममध्ये काही कपात केली, परंतु डिटेल्स दिलेले नाहीत. आमच्याकडे ट्रस्ट आणि सेफ्टीमध्ये हजारो लोक आहेत जे ग्लोबल कंटेन्टशी संबंधित काम करतात आणि दररोज काम करणार्या टीमममध्ये सहभागी नसतात. ते म्हणाले, काही कपात अशा क्षेत्रांमध्ये होती ज्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली नाही किंवा जिथे एकत्रीकरण करणे आवश्यक होते.