• 07 Dec, 2022 09:41

TVS Raider 125 : 19 ऑक्टोबरला होणार लॉन्च; जाणून घ्या सर्व फीचर्स!

TVS Raider 125 Launch

TVS Raider 125 launch 2022 : TVS Raider 125 मध्ये TVS SmartXonect सिस्टीम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह इनव्हर्टेड 5.0 इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे. TVS मोटर कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Raider 125 लॉन्च करून 125CC मोटरसायकल सेक्टरमध्ये पुन्हा प्रवेश केला.

TVS Raider 125 launch 2022 : TVS मोटर कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Raider 125 लॉन्च करून 125CC मोटरसायकल मॉडेलमध्ये प्रवेश केला. एक वर्षानंतर कंपनी या स्पोर्टी बाईकला नवीन टॉप-स्पेक व्हेरिएंट लॉन्च करून एक फॅन्सी अपडेट देणार आहे. TVS Raider 125 उद्या म्हणजेच 19 ऑक्टोबर 2022 रोजी लॉन्च होणार आहे. TVS Raider 125 मध्ये TVS SmartXonect सिस्टीम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह इनव्हर्टेड 5.0 इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे. TVS मोटर कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Raider 125 लॉन्च करून 125CC मोटरसायकल सेक्टरमध्ये पुन्हा प्रवेश केला. या नवीन व्हेरियंटमध्ये काय वैशिष्ट्ये असतील ते जाणून घेऊया. 

TVS Raider 125ची वैशिष्टे (Features of TVS Raider 125)

Design and features

TVS Raider 125 मध्ये TVS SmartXonect सिस्टीम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह इनव्हर्टेड 5.0-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे. टेक्नॉलॉजी अपडेट्स व्यतिरिक्त, TVS मोटरसायकलसाठी काही नवीन कलर शेड्स देखील लाँच करू शकतात. TVS Raider 125 सध्या ब्लेझिंग ब्लू, फायरी यलो, स्ट्राइकिंग रेड आणि विक्ड ब्लॅक कलर शेड्समध्ये उपलब्ध आहे. TVS ला आधी TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह Raider 125 चे नवीन टॉप-स्पेक प्रकार लाँच करायचे होते, परंतु सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे ते होऊ शकले नाही. आता कंपनी 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लाँच करू शकते. (2022 TVS Raider 125 launch)

इंजिन आणि किंमत (Engine & Cost)

Engine and performance

TVS Raider 125 मध्ये TVS च्या Eco Thrust इंधन इंजेक्शन टेक्नॉलॉजीसह BS6- compatible 124.8cc, सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑइल-कूल्ड इंजिन आहे. ही मोटर 7,500 rpm वर 11.2 Bhp आणि 6,000 rpm वर 11.2 Nm पीक टॉर्क निर्माण करते, 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडली जाते. TVS Raider 125 ची सध्या एक्स-शोरूम किंमत 90,620 रुपये आहे.

Image source: www.bikewale.com