केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सर्वांनुमते काही वस्तूंवर जीएसटी (Goods and Service Tax-GST) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 18 जुलैपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार आहेत. पण या दरवाढीस व्यापाऱ्यांनी विरोध (GST Protest) केला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास व्यापाऱ्यांनी भारत बंदचा (Bharat Bandh) इशारा दिला आहे.
अन्नधान्य, तेल, गॅस अशा एकना अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यात आता जीएसटी परिषदेच्या नवीन धोरणामुळे दूध आणि दुग्धजन्य पॅकबंद पदार्थांसह अन्नधान्यांवर आणि इतर काही वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागू होणार आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि हा निर्णय मागे घ्यावा यासाठी भारत बंदचा इशारा (Bharat Bandh) दिला आहे. याबाबत नुकतीच पुण्यात राज्यभरातील व्यापाऱ्यांची परिषद पार पडली. या बैठकीत भारत बंद निर्णय घेण्यात आला.
सरकारने अन्नधान्यासह पॅकबंद वस्तुंवर 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास एक दिवस भारत बंद आंदोलन (GST Protest) करण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे. तसेच या वस्तुंवर लावलेल्या जीएसटीमुळे उत्पादक शेतकरी, वितरण व्यापारी आणि खरेदीदार ग्राहकांना बसणार आहे. त्याचे निवेदन व्यापाऱ्यांकडून पंतप्रधानांना दिले जाणार आहे.