देशात जीएसटी (GST) लागू झाल्यानंतर प्रत्येक वस्तू व सेवांवर एकच कर (टॅक्स) लागला आहे. व्हॅट, एक्साइज व सेवा कर यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे 32 टॅक्सेस काढून टाकून संपूर्ण देशात एकच जीएसटी टॅक्स लागू करण्यात आला. त्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत.
जीएसटी म्हणजे काय?
जीएसटी हा वस्तू किंवा सेवा सेवा खरेदीसाठी ग्राहकांवर लावलेला टॅक्स आहे. या टॅक्सची अंमलबजावणी 1 जुलै, 2017 पासून सुरू करण्यात आली. जीएसटीपूर्वी ग्राहकांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टॅक्स लावले जात होते. प्रत्यक्ष टॅक्समध्ये ग्राहकांकडून इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, गिफ्ट टॅक्स, पालिकेचा टॅक्स आदी टॅक्सचा समावेश होता. तर अप्रत्यक्ष टॅक्समध्ये एकूण 17 प्रकारचे टॅक्स समाविष्ट होते. हे सर्व टॅक्स रद्द करून सरकारने ते एका टॅक्समध्ये एकत्रित केले. त्याला जीएसटी (Goods & Services Tax) टॅक्स म्हटले गेले. हा टॅक्स विविध वस्तू आणि सेवांवर लावला जातो. संपूर्ण देशात सर्व वस्तूंवर एकाच पद्धतीने टॅक्स लावला जातो.
जीएसटीचे प्रकार (Types of GST)
सीजीएसटी (CGST) : हा टॅक्स पूर्णपणे केंद्र सरकार लावते. हा टॅक्स 9 टक्के आहे. कायद्यान्वये हा सरकारचा अधिकार असून तो देणे सर्वांना बंधनकारक आहे.
एसजीएसटी (SGST) : राज्य सरकार ज्या खरेदी, विक्री वस्तूंवर आणि सेवांवर टॅक्स लावते, त्याला एसजीएसटी म्हणतात. हा टॅक्स सुद्धा 9 टक्के दराने आकारला जातो. केंद्राचे 9 टक्के आणि राज्याचे 9 टक्के असे ग्राहकाला एकूण 18 टक्के टॅक्स देणे बंधनकारक आहे.
युटीजीएसटी (UTGST) : युटीजीएसटी हा कर भारतातील केंद्रशासित प्रदेशांना लागू होतो. यात अंदमान व निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवली, दमण दीव, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, लदाख, यांचा समावेश होतो.
आयजीएसटी (IGST) : हा कर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात केल्या जाणाऱ्या व्यापाराशी संबंधित आहे.
जीएसटीचे काय फायदे आहेत
- देशातील सगळ्या राज्यांना एकच टॅक्स लागू आहे.
- कोणत्याही खरेदी किंवा विक्री केलेल्या वस्तूवर आणि सेवांवर समान कर आकारला जातो.
- सगळीकडे समान कर असल्याने परदेशातील कंपन्यांना येथे गुंतवणूक करण्यास सोपे होते.
- जीएसटी आल्यानंतर विक्री कर, व्हॅट, करमणूक कर, केंद्राचा कर असे सर्व टॅक्स बंद झाले आणि सर्वत्र एकच कर लागू केला.
जीएसटी नोंदणी कशी करायची
- वस्तू आणि सेवा कराचा लाभ घेण्यासाठी त्याची नोंदणी करावी लागते. ही नोंदणी कशी करायची याबाबत आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.gst.gov.in या वेबसाईटला भेट देऊन रजिस्ट्रेशन करा.
- तुमची वैयक्तिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला तात्पुरता संदर्भ क्रमांक (TRN) मिळेल. हा क्रमांक पुढील प्रक्रियेसाठी म्हणजेच भाग B साठी महत्त्वाचा आहे.
- भाग B वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सबमिट करा. दरम्यान तुम्ही सबमिट केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
- अर्ज मंजूर झाला की, तुमचा जीएसटी क्रमांक (GSTIN) तयार झाल्यावर तुम्हाला तो ईमेलने पाठवला जातो.