Top 5 Types of Investments: जीवनात गुंतवणूक करणे फार महत्वाचे असते. उतरत्या वयात गुंतवणूकीवरच आय़ुष्य चालते असे म्हणण्यास हरकत नाही. जर तुम्ही गुंतवणूक केली नसेल, तर नवीन वर्षात हा संकल्प नक्की करा. हा संकल्प तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. गुंतवणूक कशी करायची? हे जर माहित नसेल, तर आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत गुंतवणूकीचे टॉप 5 प्रकार
Table of contents [Show]
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
भारतात मोठया संख्येने लोक ही गुंतवणूक करतात. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे आपल्या रोजच्या वापरातील शब्द पीएफ (PPF). आपल्याला कोणत्याही बॅंकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून पीएफमध्ये गुंतवणूक करता येईल. प्रत्येक बॅंकेची गुंतवणूक करण्याची रक्कम वेगळी असते. तसेच पीपीएफ ठेवींची वार्षिक मर्यादा किमान 500 ते 1.50 लाख इतकी आहे. हा गुंतवणूक प्रकार 15 वर्षाच्या लॉक-इन कालावधीसह आहे.
शेअर ही अशी संकल्पना आहे, जी इक्विटी मार्केट व स्टॉकमधील गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देते. गुंतवणूकीसाठी योग्य स्टॉक निवडण्यासाठी सातत्याने अपडेट राहणे आवश्यक असते. शेअर बाजारातील प्रत्येक अपडेट समजण्यासाठी वेळ देणे फार महत्वाचे असते.
रिअल इस्टेट (Real Estate)
रिअल इस्टेट हा एक गुंतवणूकीचा प्रकार आहे. यामध्ये भाडयाचे उत्पन्न मिळविण्यासाठी निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करणे आवश्यक असते. यामुळे उत्पन्नाचा एक ठराविक आकडा दरमहा आपल्या हाती येतो. या संपत्तीचे दर बाजार मुल्यनुसार पुढे ही वाढवू शकते. रिअल इस्टेट खरेदीवर मात्र अतिरिक्त खर्च करावा लागतो.
ठेव प्रमाणपत्र (Certificate of Deposit)
मनी मार्केटशी संबंधित सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हा एक गुंतवणूकीचा प्रकार आहे. यामध्ये गुंतवणूकदाराने जमा केलेल्या निधीवर प्रमाणपत्र जारी केले जाते. ते बँकेत ठराविक कालावधीसाठी डिमटेरियल फॉर्ममध्ये गुंतवले जाते. ठेव प्रमाणपत्र फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) द्वारे जारी केले जाते आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे नियंत्रित केले जाते.
रोखे (Bond)
भारतातील कर्ज गुंतवणूकपैकी रोखे (Bond) हा एक प्रकार आहे. गुंतवणूकदार रोख्याच्या बदल्यात जारीकर्त्या कंपनीला पैसे देतात आणि बाँडच्या बदल्यात जारीकर्ता मूळ रकमेवर व्याज देण्यास बांधील असतो. जारीकर्त्याने कर्ज घेतलेल्या रकमेवर निश्चित व्याजदरासह कर्ज घेतलेल्या पैशाची परतफेड करणे आवश्यक आहे.