Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Titan LTD Q3 Results: टायटनचा तिमाही निकाल जाहिर, कंपीनाला झालाय 951 कोटींचा फायदा

Titan LTD Q3 Results

Titan LTD Q3 Results: फेस्टिव्हल काळात टायटनच्या प्रोडक्ट्सना मोठी मागणी मिळाल्यामुळे, नफ्यात वाढ झाली आहे. टाटा समुहाच्या टायटन कंपनीचा डिसेंबर 2022 चा तिमाही निकाल जाहिर झाला आहे. या निकालात म्हटले आहे की कंपनीला 951 कोटींचा स्टँडअलोन नफा झाला आहे.

Titan LTD Q3 Results: टाटा समूहाची प्रमुख कंपनी टायटनने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत दुहेरी अंकी महसुलात वाढ केली. सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या मजबूत मागणीच्या पार्श्वभूमीवर टायटनने ही प्रभावी वाढ साधली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टायटनने 951 कोटी रुपयांचा स्वतंत्र निव्वळ नफा कमावला आहे. टायटनच्या स्वतंत्र निव्वळ नफ्यात वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 3.7 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टायटनला 987 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मात्र, गेल्या 1 महिन्यात टायटनचे शेअर्स सुमारे 12 टक्क्यांनी घसरले आहेत.

तिमाही निकालात काय म्हटले आहे? (What does the quarterly result say?)

कंपनीच्या उत्पादनांची विक्री 10 हजार 444 कोटी होती टायटनच्या उत्पादनांची विक्री डिसेंबर 2022 तिमाहीत एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढून 10 हजार 444 कोटी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टायटनच्या उत्पादनांची विक्री 9 हजार 381 कोटी रुपये होती. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत ज्वेलरी विभागाचे एकूण उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढून 9 हजार 518 कोटी रुपये झाले आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत घड्याळे आणि वेअरेबल्स विभागाचे एकूण उत्पन्न 15 टक्क्यांनी वाढून 811 कोटी रुपये झाले आहे. टायटनचा शेअर गुरुवारी एनएसई वर 1.79 टक्क्यांच्या वाढीसह 2 हजार 304 रुपयांवर बंद झाला. टायटनचे व्यवस्थापकीय संचालक सीके वेंकटरामन म्हणाले, "या तिमाहीत सणासुदीची मजबूत मागणी होती आणि गेल्या वर्षी याच तिमाहीत मजबूत आधार असूनही आम्ही 12 टक्क्यांची निरोगी दोन अंकी वाढ साधली."

टायटनच्या समभागांनी गेल्या 20 वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) येथे 21 फेब्रुवारी 2003 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 2.97 रुपयांच्या पातळीवर होते. बीएसई येथे 2 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 2 हजार 308.10 रुपयांवर बंद झाले. तर, 3 फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्सने 4.84 टक्क्यांच्या उसळीसह 2 हजार 419.90 अंकांच्या पातळीवर पोहोचले. टायटनच्या समभागाची 52 आठवड्यांची उच्च पातळी 2 हजार 791 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांचा नीचांक 1 हजार 825.05 रुपये आहे. जर, एखाद्या व्यक्तीने 21 फेब्रुवारी 2003 रोजी टायटनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि कंपनीचे शेअर्स विकले नसतील तर हे पैसे सध्या 7.76 कोटी रुपये झाले असते. आम्ही या गणनेत कंपनीने दिलेले बोनस शेअर्स समाविष्ट केलेले नाहीत.

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)