Titan Company Stock Price : टायटन कंपनीचे शेअर्स (Titan Company Shares) आज तेजीमध्ये असल्याचे दिसत आहेत. आज कंपनीचा शेअर 8 टक्क्यांनी वाढून 2172 रूपयांवर (Titan Share Price) पोहोचला आहे. काल (दि. 6 जुलै) तो 2014 रूपयांवर बंद झाला होता.
टायटन कंपनीने 2023 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील माहिती जारी केली आहे. या माहिती अनुसार, कंपनीने या काळात दमदार कामगिरी केली आहे. कंपनीने वार्षिक आढाव्यावर आधारित 3 पट नफा मिळवला आहे. टायटनच्या घड्याळापासून ज्वेलरी अशा सर्व उत्पादनांमध्ये ग्रोथ झाल्याचे दिसून येत आहे. कंपनीच्या पहिल्या तिमाहीतील आकडे पाहून ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी या शेअर्समध्ये 48 टक्क्यांची वाढ (Titan Company Stock Price) होईल, असा अंदाज वर्तवला आहे. शेअर मार्केटचा बिग बॉस राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील व्हॅल्यूनुसार टायटन कंपनीचा शेअर हा टॉप शेअर्समध्ये आहे. या शेअर्सवर झुनझुनवाला यांनी खूप दिवसांपासून विश्वास ठेवला आहे.
कोविड-19च्या परिस्थितीनंतर टायटनला चांगला प्रतिसाद
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांच्या मते Titan Company साठी 2023 हे आर्थिक वर्ष दमदार असणार आहे. या वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 3 पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कोविड-19 नंतरच्या परिस्थितीनंतर आता कंपनीचा व्यवसाय सामान्य पातळीवर आला असून लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ब्रोकरेज कंपन्यांनी लार्ज कॅप सेगमेंटमध्ये टायटनला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. टायटनच्या शेअर्समध्ये 48 टक्क्यांनी वाढ दर्शवत याचा भाव 2900 (Titan Share Price) रूपयांपर्यंत जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
टायटनच्या शेअर्सची अर्निंग ग्रोथ व्हिजिबिलिटी मजबूत असल्याचं ब्रोकरेज कंपन्यांचे म्हणणं आहे. कंपनी प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहे. ज्वेलरी क्षेत्रात इतर कंपन्यांच्या तुलनेत टायटनच्या ज्वेलरी सेक्टरला चांगला फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. या सेक्टरमध्ये कंपनी आपला मार्केट शेअर वाढवण्याचा विचार करत आहे.
विक्रीमध्ये 205 टक्क्यांची वाढ!
टायटनच्या पहिल्या तिमाहीमध्ये वार्षिक कालावधीवर आधारित 205 टक्क्यांनी म्हणजे जवळपास 3 पट वाढ झाली आहे. मागच्या वर्षि कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कंपनीच्या विक्रीवर विपरित परिणाम झाला होता. टाटा समुहाने बीएसई (BSE)कडे केलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे की, 2023 या आर्थिक वर्षात कंपनीने 205 टक्क्यांची वाढ केली आहे.
ज्वेलरीच्या विक्रीत 204 टक्क्यांची वाढ!
टायटनने पहिल्या तिमाहीत ज्वेलरी सेक्टरच्या विस्ताराचे धोरण सुरू ठेवले आहे. कंपनीने 30 जूनपर्यंत ज्वेलरी स्टोअर्सची संख्या 2,160 पर्यंत वाढवली आहे. एप्रिल-जून 2022 या कालावधीत कंपनीने 120 नवीन दुकाने (Shops) सुरू केली. कंपनीच्या पहिल्या तिमाहीत दागिन्यांच्या विक्रीत 207 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
घड्याळे आणि इतर वस्तूंची विक्रमी विक्री
आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत घड्याळे आणि इतर वापरणाऱ्या वस्तुंच्या विक्रीत 158 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिमाही आधारावर हा आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळाला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मल्टी-ब्रँड रिटेल (एमबीआर), टायटन वर्ल्ड आणि लार्ज फॉरमॅट स्टोअर्स (एलएफएस) हे प्रमुख ब्रॅण्ड्स 2022 पासून चांगली कामगिरी करत आहेत.
टायटन केअरची 176 टक्के वाढ!
टायटनच्या आय केअर या सेक्टरमध्ये वर्षभरात 176 टक्क्यांची वाढ केली आहे. परफ्युममध्ये कंपनीची दरवर्षी 262 टक्क्यांनी तर फॅशन अॅक्सेसरीजमध्ये वर्षागणिक 293 टक्क्यांची वाढ झाली आहे.
(डिसक्लेमर: कोणतीही गुंतवणूक करताना अधिकृत गुंतवणूक तज्ज्ञांची मदत घ्या.)
image source- https://bit.ly/3anvCxS