रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानीला टाईम पत्रिकाने आपल्या Times 100 Next च्या यादीत स्थान दिले. Times 100 Next च्या यादीत सहभागी होणारे ते एकमेव भारतीय आहेत. यात भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यावसायिक आम्रपाली गान यांनाही स्थान देण्यात आलं आहे. Times 100 Nextच्या यादीत उद्योग जगतातील जगभरातील अशा 100 उभरत्या उद्योजकांना स्थान दिले जाते. जे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणि उद्योग विश्वात नवीन इतिहास रचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक चेअरपर्सन नीता अंबानी यांचे सुपुत्र आकाश याची Times 100 Next च्या लीडर कॅटेगरीत निवड करण्यात आली. 30 वर्षीय आकाश अंबानी याला जून, 2022 मध्ये भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी जिओच्या चेअरमनपदी बढती देण्यात आली होती. सध्या जिओ टेलिकॉमचे 42.2 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. आकाश अंबानी यांच्यासोबत अमेरिकेची प्रसिद्ध गायिका एसजेए, अभिनेत्री सिडनी स्वीनी, बास्केटबॉल खेळाडू जा मोरेंट, स्पेनचा टेनिस खेळाडू कार्लोस अल्कराज, अभिनेता आणि टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा के के पामर तसेच पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ता फरविजा फरहान यांचेसुद्धा Time 100 Next च्या यादीत नाव आहे.
Time 100 Nest च्या लिस्टमध्ये एकमेव भारतीय
'Time 100 Nest'च्या लिस्टमध्ये भारतातून स्थान मिळवणारे आकाश अंबानी हे एकमेव बिझनेसमॅन आहेत. टाईम्सने ही यादी घोषित करताना आकाश अंबानी याच्याबद्दल ‘जगातील उगवता स्टार…’ असे मत व्यक्त केले. आकाश अंबानीला वयाच्या 22 व्या वर्षी जिओ टेलिकॉमच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आले होते. त्यानंतर लगेच त्याच वर्षात जून महिन्यात जिओच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली.
जिओचं 5G लॉन्चिंग आकाश अंबानींच्या देखरेखीखाली...
रिलायन्स जिओने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या 4 प्रमुख मेट्रो शहरांमध्ये 5G लॉन्च करण्याची पूर्ण तयारी केली. जिओ ही एकमेव कंपनी आहे. जिने 700 मेगाहर्टझ स्पेक्ट्रम बॅण्ड बोली लावून विकत घेतला. हा एकमेव असा स्पेक्ट्रम बॅण्ड आहे. जो 5G नेटवर्कसाठी गरजेचा आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये 5G नेटवर्कसाठी 700 मेगाहर्टझ बॅण्ड हा प्रीमिअम बॅण्ड मानला जातो.
भारतीय वंशाच्या आम्रपाली गान यांचाही समावेश
आम्रपाली गान या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘ओन्लीफॅन्स’च्या सीईओ म्हणून काम पाहत आहेत. सप्टेंबर, 2020 मध्ये त्या कंपनीच्या मुख्य मार्केटिंग आणि कम्युनिकेशन अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. गान यांच्या कामाची दखलसुद्धा टाईमने घेतली.