Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RIL AGM Live : दिवाळीपासून मुंबईत 5G सेवा, मुकेश अंबानींकडून जिओ फाईव्ह-जी स्ट्रॅटेजी जाहीर

RIL AGM

RIL 45th AGM Today: सर्वाधिक बाजारमूल्य असेलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची सध्या वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) सुरु आहे. नुकताच पार पडलेल्या फाईव्ह जी स्पेक्ट्रम (5G Spectrum) लिलावात रिलायन्स जिओ आघाडीवर राहिली होती. जिओ दिवाळीपासून मुंबईसह चार महानगरांत फाईव्ह-जी सेवा देण्याची घोषणा केली. फाईव्ह जी सेवेचा रोडमॅप आजच्या सभेत मुकेश अंबानी सादर केला. (Jio 5G will start in Mumbai from Diwali)

रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा (Reliance AGM Today) सुरु आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 45 व्या वार्षिक सभेला रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. नुकताच पार पडलेल्या देशातील पहिल्या वहिल्या फाईव्ह-जी स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ आघाडीवर होती. रिलायन्स जिओची फाईव्ह-जी सेवा मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या महानगरांमध्ये दिवाळीपासून सुरु करणार असल्याची घोषणा अंबानी यांनी केली. डिसेंबर 2023 पर्यंत प्रत्येक तालुक्यात जिओ फाईव्ह जी सेवा सुरु होणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. जिओ भारतात कधी फाईव्ह जी सेवा सुरु करणार त्याची उत्सुकता कोट्यावधी युजर आणि रिलायन्सच्या समभागधारकांना लागली होती. अंबानी यांच्याकडून आजच्या सभेत रिलायन्स जिओच्या फाईव्ह जी प्लॅन्सबाबत मोठी घोषणा करण्यात आली. (Mukesh Ambani announce Jio 5G Plan and Strategy in AGM) 

मागील पाच पैकी दोन सभांमध्ये अंबानी यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू रिलायन्स जिओ होता. आजच्या बैठकीत देखील जिओबाबत मोठ्या घोषणा होऊ शकतात. 2021 च्या सभेत अंबानी यांनी जिओ नेक्स्ट फोनची घोषणा केली होती. त्याशिवाय ग्रीन एनर्जीसाठी 75000 कोटींची घोषणा केली होती. फाईव्ह जी स्पेक्ट्रमसाठी रिलायन्स जिओने तब्बल 88000 कोटी खर्च केले आहेत. फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलावातून सरकारला 1.5 लाख कोटींचा महसूल मिळाला होता.

आज जिओ आणि गुगलकडून डेव्हलप करण्यात आलेला जिओ फाईव्ह जी फोनची घोषणा होऊ शकते, असं बोलले जात आहे. जिओ फाईव्ह जी फोनची किंमत 12000 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. याशिवाय रिलायन्सकडून जिओचा आयपीओ आणण्याबाबत देखील चाचपणी केली जात आहे. अंबानी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल या दोन कंपन्यांच्या IPO बाबत देखील घोषणा करु शकतात. 5G साठीचे नेटवर्क आणि नवीन गुंतवणूक याबाबत सविस्तर प्लॅन अंबानी समभागधारकांसमोर सादर केला. जिओ 5G साठी दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. 

Image Source :  Wikipedia