Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

5G इंटरनेट सेवेसह जिओ स्वस्तातला 5G मोबाईलही आणणार!

5G इंटरनेट सेवेसह जिओ स्वस्तातला 5G मोबाईलही आणणार!

Reliance 5G Mobile : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सोमवारी (दि. 29 ऑगस्ट) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Reliance AGM Today) रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिवाळीपर्यंत 5G सेवेसह स्वस्तातील 5G मोबाईल आणण्याची घोषणा केली.

Reliance 5G Mobile : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सोमवारी (दि. 29 ऑगस्ट) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Reliance AGM Today) रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिवाळीपर्यंत 5G सेवेसह स्वस्तातील 5G मोबाईल आणण्याची घोषणा केली. जिओ कंपनी भारतात 5G सेवा सुरु करण्याची उत्सुकता कोट्यवधी युझर्सना लागली होती. त्याबाबतची अधिकृत घोषणा मुकेश अंबानी यांनी आज केली. डिसेंबर 2023 पर्यंत भारतातील प्रत्येक तालुक्यात 5G सेवा सुरु होणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. अंबानी यांनी आजच्या सभेत फाईव्ह जी (5G) प्लॅनबाबत मोठी घोषणा केली. (Mukesh Ambani announce Jio 5G Plan and Strategy in AGM)

रिलायन्स इंडस्ट्रीजची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Reliance AGM Today) सोमवारी (दि. 29 ऑगस्ट, 2022) ऑनलाईन पार पाडली. या सभेला रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. या सभेत मुकेश अंबानी यांनी जिओ कंपनी मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्ये येत्या दिवाळीपासून 5G सेवा सुरु करणार आहे; त्याचबरोबर अंबानी  यांनी 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी स्वस्तात म्हणजेच 12 हजार रूपयांत 5G स्मार्ट मोबाईल लॉण्च करणार आहे. यासाठी जिओने जगभरातील नामांकित आयटी कंपन्यांसोबत भागीदारी केली.

जिओने भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सिस्को यासारख्या जगभरातील नामांकित आयटी कंपन्यांसोबत भागीदारी करणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. 5G सेवा वापरण्यासाठी 5G स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. यावरही अंबानी यांनी मात करत 5G सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी स्वस्तातला 5G स्मार्टफोन लॉण्च करणार असल्याची घोषणा केली. हा स्मार्टफोन 12 हजार रूपयांपर्यंत असू शकतो.

काय असतील जिओच्या 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये?

जिओ कंपनीच्या 5G स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसर, 4 किंवा 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल मेमरी असलेला स्मार्टफोन लॉण्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

6.5 इंचाचा डिस्प्ले आणि 13 मेगापिक्सलचा कॅमेरा!

जिओच्या 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाची स्क्रीन असून ती स्क्रीन HD+IPS LCD असू शकते. याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेंसर असू शकतो. 

दिवाळीत जिओचा डबल धमाका!

जिओ 5 जी इंटरनेट सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रो शहरात दिवाळीपर्यंत सुरू करणार आहे. तर डिसेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक शहरात 5 जी सेवा दिला जाणार आहे. या दिवाळीत जिओ कंपनी 5G सेवेसोबतच स्वस्तातला 5G स्मार्टफोन आणून ग्राहकांना डबल धमाका ऑफर देण्याची शक्यता आहे. यासाठी कंपनी दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

मुकेश अंबानी यांनी आजच्या सर्वसाधारण सभेत जिओ देशातील प्रत्येक शहरात 5G सेवा देणार असल्याचे सांगत ही सेवा स्वस्तात देणार असल्याचे म्हटले आहे. जिओने 5G च्या माध्यमातून 100 मिलियन घरांना जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.