Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ganga Vilas Cruise : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या क्रूझचे तिकीट दर ठाऊक आहेत?

Ticket Price of Ganga Vilas Cruise in the world's Longest River

Image Source : http://www.indoasia-tours.com/

Ganga Vilas Cruise : अभिमानाची बाब म्हणजे, जगातील सर्वात लांब नदीमधील क्रूझ ही 'गंगा विलास क्रुझ' (Ganga Vilas Cruise) भारतात आहे. आज या क्रुझला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modhi) यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. यानंतर ही क्रुझ 51 दिवसात 3200 किमीचा प्रवास करणार आहे. चला, तर मग या क्रुझच्या तिकिटाची किंमत जाणुन घेवुयात.

 Ganga Vilas Cruise in the world's Longest River: वाराणसी (Varanasi) येथे गंगा नदी किनारे आज धुमधडाक्यात ‘गंगा विलास क्रुझ’चे उद्घाटन होणार आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रमात करोडो लोकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांचा आवाज घुमणार आहे. अशा या भव्य-दिव्य गंगा विलास क्रुझच्या तिकिटाचे दर जाणून घेवुयात. 

काय असणार तिकिटाचे दर ( Ticket price)

जगातील सर्वात लांब क्रुझ ‘गंगा विलास’ ही संपूर्ण जगासमोर एक नवीन माॅडेल सादर करणार आहे. ही क्रुझ एक प्रकारचा इतिहास घडविणार आहे. या एेतिहासिक क्रुझचा प्रवास 51 दिवसांचा असून 3200 किमीचा टप्पा ती पार करणार आहे. वाराणसी येथुन सुरू झालेला तिचा प्रवास आसामच्या डिब्रुगड (Dibrugarh) येथे संपणार आहे. या दरम्यान ती भारत व बांग्लादेशमधील 27 नदयांमधून प्रवास करणार आहे. अशा या भव्य-दिव्य गंगा विलास क्रुझच्या तिकिटाची किंमत ही 12.59 लाखापेक्षा ही अधिक असणार आहे. या क्रुझच्या पहिल्या प्रवासात स्विर्झलॅंडचे 32 पर्यटक असणार आहेत. जे सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत प्रवास करणार आहेत. या क्रुझेच तिकिट आपण ‘Antara Luxury River Cruises’ या वेबसाइटवरून बुक करू शकता.

लक्झरी क्रुझ (Luxury Cruise)

गंगा विलास क्रुझमधील सोई-सुविधा या फाइव्ह स्टार हाॅटेलपेक्षा कमी तर नक्कीच नसणार आहेत. या पर्यटकांसाठी एक 40 सीटचे असणारे रेस्टाॅरंट, स्पा रूम, स्विमिंग पूल, जिम व तीन सनडेकच्या सुविधा असणार आहेत. तसेच यामध्ये पर्यटकांना गाणे, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. या क्रुझची लांबी 62 मीटर व रूंदी 12.8 मीटर आहे. पर्यंटकांना राहण्यासाठी यामध्ये एकूण 18 सुटस् आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या गंगा विलास क्रुझचा प्रवास हा अव्दितीय व शानदार ठरणार आहे.