Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ganga Vilas Cruise Launch: जगातील सर्वात लांब अंतर पार करणारी क्रुझ भारतात, उद्या होणार उद्घाटन

Ganga Vilas Cruise Launch

Image Source : http://www.newsonair.gov.in/

Ganga Vilas Cruise: जगातील सर्वात लांब अंतर पार करणाऱ्या क्रूझचे नाव ‘गंगा विलास’ (Ganga Vilas) असून, उद्या (13 जानेवारी) ला या क्रूझचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. सोबतच ते वाराणसी (Varanasi) शहरातील गंगा नदीच्या किनाऱ्यावर टेंट सिटीलादेखील हिंरवा झेंडा दाखविणार आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Ganga Vilas Cruise: जगातील सर्वात लांबच्या प्रवासाला निघालेले हे गंगा विलास क्रुझ (जहाज), भारतातील नदीपात्रात प्रवास करणारे पहिले क्रुझ आहे. या क्रुझच्या उद्घाटनासह पंतप्रधान याच कार्यक्रमात एक हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात येणाऱ्या अनेक अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. पर्यटनाला चालना मिळावी हा प्रवासाचा मुख्य हेतू असून, संपूर्ण जगातील पर्यटकांसमोर भारताचे हे नवीन मॉडेल सादर करण्यात येणार आहे. चला, तर मग  या क्रुझसंबंधी अधिक जाणून घेवुयात.  

प्रवासाची सुरूवात व शेवट (The Beginning and End of the Journey)

जगातील सर्वात लांब पल्ल्याचे अंतर पार करणाऱ्या या क्रुझचा प्रवास वाराणसी या ठिकाणावरून सुरू होऊन शेवट डिब्रुगड येथे होणार आहे. हा प्रवास 50 दिवसांचा असून या कालावधीमध्ये क्रूझ 3200 किमीचा प्रवास करणार आहे. विशेष म्हणजे ही क्रूझ भारत व बांग्लादेशच्या 27 नदयांमधून प्रवास करणार आहे. हे क्रूझ राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांमधूही जाणार आहे.

कोणत्या नदींमधून करणार प्रवास (Which Rivers to Travel through)

गंगा विलास क्रूझ ही एकूण 27 नदयांमधून प्रवास करणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, बांग्लादेश व आसाममधील नद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गंगा, मेघना व ब्रम्हपुत्रा या तीन मुख्य नद्यांमधूनदेखील जलमार्ग असणार आहे. ही क्रूझ भागीरथी, हुगळी, बिद्यावती, मालता व इतर नदीसह  बांग्लादेशातील मेघना, पद्मा, जमुना व भारतातील ब्रम्हपुत्रा आसाममध्ये दाखल होईल. या क्रूझवर एकूण 80 प्रवाशी असणार आहेत.

काय असणार सोई-सुविधा (What will be the Convenience)

गंगा विलास क्रुझ ही एकदम लग्झरी असणार आहे. यावरील प्रवाशांचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये यासाठी मनोरंजन म्हणून क्रूझवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. यामध्ये गाणे, संगीतदेखील वाजणार आहेत. तसेच प्रवाशांना व्यायाम करता यावा, या हेतूने जीमदेखील उपलब्ध आहे. या क्रुझची लांबी 62.5 मीटर व रूंदी 12.8 मीटर आहे. प्रवाशांना राहण्यासाठी एकूण अठरा सुट असून 40 सीटर रेस्टाॅरंट, स्पा रूम व 3 सनडेक समावेश आहे.