पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते जगातल्या सगळ्यात मोठ्या नदीवरच्या क्रूझचं (River Cruise) लोकार्पण आज (13 जानेवारी) पार पडलं आहे. ‘या क्रूझमुळे पूर्व भारत जगाच्या पर्यटन नकाशावर येईल. आणि स्थानिकांना नोकरीच्या शोधात बाहेरच्या राज्यांमध्ये भटकावं लागणार नाही,’ असं उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. अशा या गंगाविलास क्रूझची (Ganga Vilas Cruise) एक झलक बघूया फोटोंमधून…
51 दिवसांत 3,200 किलोमीटरचा नदीवरचा प्रवास ही क्रूझ करणार आहे. अर्थात, तुम्ही एकेका दिवसांचं बुकिंगही करू शकता. 62 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद अशी ही बोट असणार आहे.
या बोटीवरची ही एक खोली किंवा इंग्रजीत स्वीट. अशा 18 खोल्या क्रूझवर आहेत. आणि त्यामध्ये 36 प्रवासी राहू शकतात.
क्रूझचा हा प्रशस्त डेक. 27 नदी प्रवाहांमधून या क्रूझचा प्रवास होणार आहे. आणि 50 पर्यंटन स्थळं या प्रवासात जोडली जाणार आहेत.
हे या बेटीवरचं एक रेस्टॉरंट आहे. शिवाय इथं स्पा, सलोन आणि जिमसारख्या सुविधाही आहेत. आणि भाडं म्हणाल तर पूर्ण 51 दिवसांचं भाडं आहे फक्त 20,00,000 रुपये. आणि एका दिवसाचं भाडं 25,000 ते 40,000 रुपये इतकं आहे.
या क्रूझबरोबरच पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज वाराणसीच्या काठावर एका टेंट हाऊसचं उद्घाटनही करण्यात आलं. यात 200 तंबू आहेत. आणि त्यातून वाराणसीच्या काठाचा संपूर्ण पॅनोरमिक नजारा पाहायला मिळतो, असं पर्यटन मंत्रालयाने म्हटलं आहे.