Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नवीन वर्षापूर्वीचं 'या' राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिली आनंदाची बातमी, DA मध्ये केली तब्बल इतकी वाढ!

Increase in DA of Employees

Increase in DA of State Govt. Employees: मेघालय सरकारने राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 4 टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे.

Increase in DA of State Govt. Employees: मेघालय सरकारने(Meghalaya Government) राज्य कर्मचाऱ्यांसाठी(State Employee) एक आनंदाची बातमी दिली आहे. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा आनंदाचा धक्का दिला आहे. मेघालय सरकारने राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 4 टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार असून सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्यात ही वाढ जुलै 2022 पासून लागू होणार आहे. चला तर याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये केली वाढ

सरकारच्या या घोषणेनंतर मेघालय (Meghalaya) कर्मचाऱ्यांचा डीए जुलै 2022 पासून 28 टक्क्यांवरुन 32 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी 29 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली होती. आता 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांच्या खात्यात 38 टक्के दराने डीए येणार असल्याने कर्मचारी नवीन वर्ष अतिशय आंनदाने साजरे करणार आहेत.

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला

केंद्र सरकारने याआधी कर्मचाऱ्यांच्या (Employees) महागाई भत्त्यातही वाढ केली होती. एवढेच नाही तर आतापर्यंत आलेले AICPI चे आकडे पाहता नवीन वर्षात म्हणजेच 2023 च्या जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA वाढण्याची शक्यता आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. केंद्र सरकारशिवाय अनेक राज्य सरकारांनीही महागाई भत्त्यात वाढ केली आहे. या राज्यांमध्ये झारखंड(Jharkhand), छत्तीसगड(Chhattisgarh), हरियाणा(Haryana), यूपी(UP), कर्नाटक(Karnataka), पंजाब(Panjab), आसाम(Assam) इ. राज्यांचा समावेश असून आता यामध्ये मेघालय सरकारने हा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव पगार आणि पेन्शनचा लाभ यापुढे मिळणार आहे. यासोबतच येत्या वर्षात म्हणजेच, 2023 मध्येही कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव भत्त्याची रक्कम देखील सरकार टाकणार आहे. त्यामुळे येणारे नवीन वर्ष कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाचे आणि अधिक मिळतीचे होणार आहे.