Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund NFO : 'या' नव्या इक्विटी फंडातून कमाईची चांगली संधी, 5000 रुपयांपासून सुरू करा एसआयपी

Mutual Fund NFO : 'या' नव्या इक्विटी फंडातून कमाईची चांगली संधी, 5000 रुपयांपासून सुरू करा एसआयपी

Mutual Fund NFO : म्युच्युअल फंड हाउस असलेल्या क्वांट म्युच्युअल फंडानं इक्विटी प्रकारात नवा सेक्टरल/थीमॅटिक फंड (NFO) आणलाय. क्वांट म्युच्युअल फंडाची ही नवीन योजना क्वांट बिझनेस सायकल फंड अशी आहे. या योजनेची सदस्यता 12 मे 2023 पासून सुरू झालीय. तर 25 मे 2023पर्यंत अर्ज करता येणार आहे.

म्युच्युअल फंडातली गुंतवणूक (Mutual Fund investment) ही चांगल्या परताव्यासाठी केली जाते. त्यासाठी बाजारातही विविध कंपन्या म्युच्युअल फंडाच्या विविध योजना आणत असतात. आता एक नवी योजना ग्राहकांसाठी उपलब्ध झालीय. क्वांट म्युच्युअल फंडानं ही नवी योजना आणलीय. ही इक्विटीच्या प्रकारातली तसंच एक ओपन एंडेड योजना आहे. म्हणजेच गुंतवणूकदार त्यांना हवं तेव्हा रिडीम करू शकतील. मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या मते, ही एक उत्तम योजना असून दीर्घकालीन भांडवल वाढीसाठी उपयुक्त ठरू शकते.

सुविधा?

क्वांट म्युच्युअल फंडात विविध सुविधा मिळतात. यानुसार कोणीही क्वांट बिझनेस सायकल फंड एनएफओमध्ये किमान 5,000 रुपये आणि त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक सुरू करू शकतो. या योजनेत एन्ट्री आणि एक्झिट लोड नाही. याचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी 500 टीआरआय (NIFTY 500 TRI) आहे. किमान एसआयपी रक्कम दैनिक, साप्ताहिक आणि मासिक स्तरावर असून ही एसआयपी रुपये 1000 आहे. मासिक एसआयपीची किमान रक्कम 300 रुपये आहे. अंकित ए. पांडे हे या योजनेचे फंड मॅनेजर आहेत.

उद्देश काय?

अनेकांना दीर्घकालीन योजना घ्यायची असते. कारण दीर्घकालीय योजनांमधून मिळणारा परतावा अधिक असतो. या योजनेचा उद्देशदेखील दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणं हा आहे. या योजनेचे उद्दिष्ट साध्य होईल याची कोणतीही हमी किंवा खात्री दिली जात नाही. ही योजना खात्रीशीर परताव्याचीही (Guaranteed return) हमी देत ​​नाही.

कोण करू शकतो गुंतवणूक?

ज्यांना दीर्घ मुदतीसाठी भांडवली वाढ हवी आहे, असे गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतात, असं या म्युच्युअल फंड हाऊसचं मत आहे. दीर्घकालीन निफ्टी 500 TRIच्या कामगिरीशी सुसंगत परतावा (ट्रॅकिंग एरर) पाहिजे असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना म्हणजे एक चांगला पर्याय असू शकणार आहे. या योजनेचा पैसा राइडिंग बिझनेस सायकलसह सेक्टर आणि स्टॉकमध्ये गुंतवला जातो.

काय आहे एनएफओ?

एनएफओ म्हणजेच न्यू फंड ऑफर (New fund offer) होय. एखादी म्युच्युअल फंड ऑफर करणारी कंपनी पहिल्यांदाच फंड ऑफर करते, त्या फंडाला एनएफओ म्हटलं जातं. कोणताही फंड बाजारात आणणं यामागचा हेतू बाजारातून पैसा कमावणं हाच असतो. न्यू फंड ऑफरच्या माध्यमातून अशाप्रकारच्या नव्या फंडात गुंतवणूकदारास गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिलं जातं. या मार्फत गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या योजना देण्याचा म्युच्युअल फंड कंपन्यांचा प्रयत्न असतो. ओपन आणि क्लोज एंड अशा दोन प्रकारच्या या एनएफओ योजना असतात. यापैकी वरची योजना ही ओपन एंडेड आहे. ओपन एंड योजनेत गुंतवणूकदाराला नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूनुसार पैसे गुंतवता येत असतात. सर्वसाधारणपणे अनेकजण म्युच्युअल फंडालाच अधिक पसंती देतात. यात तुम्हाला एनएफओच्या फंडाची गरज असते अशावेळीच यात गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपल्या गरजेनुसारच गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)