Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual fund NFO : कमी जोखीम अन् नियमित उत्पन्न! फक्त 500 रुपयांपासून सुरू करा एसआयपी

Mutual fund NFO : कमी जोखीम अन् नियमित उत्पन्न! फक्त 500 रुपयांपासून सुरू करा एसआयपी

Mutual fund NFO : कमी गुंतवणूक करत असतानाच नियमित उत्पन्न मिळवून देणारी योजना असेल तर ही एक चांगली संधी गुंतवणूकदारासाठी असते. म्युच्युअल फंड हाऊस बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंड ही कर्ज विभागामध्ये एक नवी योजना घेऊन आलाय.

बडोदा बीएनपी परिबाच्या या एनएफओ (New Fund Offers) बडोदा बीएनपी परिबा फ्लोटर फंडाची सदस्यता 10 एप्रिलपासून सुरू झालीय. डेब्ट विभागातल्या या फ्लोटर फंडात 24 एप्रिल 2023पर्यंत सबस्क्रिप्शन करू शकता. तर ही एक ओपन एंडेड योजना आहे. म्हणजेच गुंतवणूकदार त्यांना पाहिजे तेव्हा पैसे काढू शकतात. बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंड (Baroda BNP Paribas Mutual Fund) या योजनेनुसार, तुम्ही या फंडात कमीतकमी 5,000 आणि त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येवू शकते. एसआयपीद्वारे तुम्ही या योजनेत प्रतिमहिना किमान 500 रुपये गुंतवू शकता आणि त्यानंतर 1च्या पटीत गुंतवणूक करता येईल. गुंतवणुकीची (Investment) कोणतीही कमाल मर्यादा नाही या योजनेत नाही.

अर्जाची रक्कम 1000 रुपये

या एनएफओमध्ये किमान अतिरिक्त अर्जाची रक्कम 1000 रुपये आहे. अॅसेट मॅनेजमेंट कंपनीनं या अर्जाची किमान रक्कम बदलण्याचा अधिकार स्वत:कडे राखून ठेवलाय. नियमित आणि थेट अशा दोन्ही प्रकारे या योजनेत गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. नियमित म्हणजेच वितरकामार्फत आणि कोणत्याही वितरकाशिवाय गुंतवणूक म्हणजेच थेट. गुंतवणूकदारांनी या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करावी.

नियमित उत्पन्न मिळवणं हा योजनेचा उद्देश

या योजनेत अल्पकालीन गुंतवणूक करू नियमित उत्पन्नाची गुंतवणूकदारांना संधी मिळते. फ्लोटिंग रेट इन्स्ट्रुमेंट्स किंवा फिक्स्ड रेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये (फ्लोटिंग रेट रिटर्न स्वॅप)  गुंतवणूक करून नियमित उत्पन्न मिळवणं हा या योजनेचा उद्देश आहे, असं म्युच्युअल फंड हाउसचं म्हणणं आहे. आपल्यानिव्वळ मालमत्तेचा काही भाग निश्चित दर कर्ज आणि मनी मार्केट साधनांमध्येदेखील ही योजना गुंतवू शकते. आपलं गुंतवणुकीचं उद्दिष्ट ही योजना साध्य करेल याची काहीही शाश्वती नाही. पाच व्यावसायिक दिवसांनंतर ही योजना सदस्यत्वासाठी पुन्हा उघडेल, असा नियम करण्यात आलाय.

कोण करू शकतं गुंतवणूक?

बडोदा बीएनपी परिबाची ही योजना जोखमीत सुरक्षा प्रदान करणारी योजना आहे. हा एनएफओ विविध प्रकारच्या मालमत्ता वर्गांमध्ये चांगली कामगिरी करतो, असं म्युच्युअल फंड हाउसनं म्हटलंय. नव्या आणि अनुभवी अशी दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. गुंतवणूकदार विविध योजना शोधत असतात. त्यामध्ये अनावश्यक वेळ वाया जातो. म्हणजेच अशा योजनांची सातत्यानं माहिती घेत राहणं हे त्रासदायक ठरू शकतं. तो त्रास या माध्यमातून वाचतो. अनुभवी गुंतवणूकदारांना तर ही योजना खूपच फायद्याची असल्याचं यातले जाणकार सांगतात. मल्टी कॅप गुंतवणूक प्रकाराचं अनुसरण हा याचा उद्देश आहे. निश्चित उत्पन्नाचा विचार करत असताना तुलनेनं कमी जोखीम हे याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

मागच्या वर्षीही सुरू केली होती अशीच योजना

मागच्या वर्षी बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडातर्फे बडोदा बीएनपी परिबा फ्लेक्सी कॅप फंड योजना लॉन्च करण्त आली होती. जुलै ते ऑगस्ट यादरम्यान ही योजना सुरू होती. एक डायनॅमिक प्रकारातली ही इक्विटी योजना होती. यात लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप अशा सर्व मार्केट कॅपिटलायझेशनमधल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता होती. विविध क्षेत्रातल्या कंपन्या आणि बाजारातल्या भांडवलांमध्ये गुंतवणुकीच्या संधी ओळखणं हा याचा मुख्य उद्देश होता.