Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hyundai Price Hike: ह्युंदाईची 'ही' कार एका महिन्यात एक लाख रुपयांनी महागली, जाणून घ्या किंमत

Hyundai Price Hike

Image Source : http://www.autocarindia.com/

Hyundai Price Hike: दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाईने Ionic-5 इलेक्ट्रिक कारच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने या कारची किंमत काही हजार रुपयांनी नाही तर एक लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. भारतात लॉन्च करताना Ioniq-5 ही कार Hyundai ने प्रास्ताविक किंमतीत लॉन्च केली होती. ही किंमत 44.95 लाख रुपये होती.

Hyundai Price Hike: दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाईने Ionic-5 इलेक्ट्रिक कारच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने या कारची किंमत काही हजार रुपयांनी नाही तर एक लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. भारतात लॉन्च करताना Ioniq-5 ही कार Hyundai ने प्रास्ताविक किंमतीत लॉन्च केली होती. ही किंमत 44.95 लाख रुपये होती. लॉन्चच्या वेळी कंपनीकडून सांगण्यात आले की, या कारची ही किंमत सुरुवातीच्या 500 युनिट्सपर्यंतच राहील. यानंतर किंमती बदलल्या जाऊ शकतात. माहितीनुसार, कंपनीला एका महिन्यातच या कारसाठी 650 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. त्यानंतर आता कंपनीने प्रास्ताविक किंमत रद्द करून त्याची किंमत वाढवली आहे.

18 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते….. (Can charge from 10 to 80 percent in 18 minutes….)

Ioniq-5 ह्युंदाई मोटर इंडियाने जानेवारीमध्ये भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात ऑटो एक्सपो दरम्यान लॉन्च केले होते. Ionic-5 ही इलेक्ट्रिक कार आहे, जी अनेक वैशिष्ट्यांसह येते. कंपनीच्या इतर कारच्या तुलनेत त्याचा ग्राउंड क्लीयरन्स 163 मिमी आहे. तसेच, फुल चार्ज करून 631 किलोमीटरपर्यंत चालवता येते. ते केवळ 7.6 सेकंदात शून्य ते 100 किमी वेग वाढवू शकते. हे फक्त 18 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. 

कारच्या मोटरला 217 पीएस पॉवर आणि 350 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. यात 12.3-इंचाची टचस्क्रीन सिस्टिम आहे. यासोबतच कॉलम टाईप शिफ्ट बाय वायर, व्हीईएसएस, ईपीबी, स्मार्ट टेलगेट, एलईडी टर्न इंडिकेटर, 21 सुरक्षा वैशिष्ट्यांसह एडीएएस, ह्युंदाईचे ब्लूलिंक तंत्रज्ञान यासारखी अनेक वैशिष्ट्ये यामध्ये उपलब्ध आहेत. 2023 वर्ष सुरू झाले आहे. आता कार कंपन्याही त्यांच्या कारच्या किमती एक-एक करून वाढवण्याची घोषणा करणार आहेत. नवीन वर्षात कारच्या किमती वाढवणार असल्याची माहिती अनेक कंपन्यांनी आधीच दिली होती. 

ह्युंदाई बरोबर इतरही कंपन्यांनी वाढवल्या किमती….. (Along with Hyundai, other companies also hiked prices….)

देशातील आघाडीच्या वाहन निर्मात्यांपैकी एक टाटा मोटर्स देखील जानेवारी 2023 मध्ये आपल्या सर्व कारच्या किमती वाढवणार आहे. कंपनी जानेवारीमध्ये ICE इंजिन तसेच इलेक्ट्रिक कार आणि व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी अलीकडेच एका संभाषणात सांगितले की कंपनी आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार टियागोच्या किंमतीतही वाढ करत आहे. 20,000 बुकिंगनंतर नवीन ग्राहकांच्या बुकिंगसाठी ही दरवाढ लागू होणार आहे.

फोक्सवॅगन (Volkswagen)

volkswagen-1.jpg
http://www.autocarindia.com/

जपानी कार कंपनी होंडाही नवीन वर्षात कारच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने डिसेंबरमध्येच याबाबत माहिती दिली होती. दिलेल्या माहितीनुसार सर्व वाहनांच्या किमती सुमारे तीस हजार रुपयांनी वाढणार आहेत. जर्मन कार कंपनी फोक्सवॅगनकडूनही कारच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. डिसेंबरमध्ये कंपनीने आपल्या सर्व कारच्या किमती वाढवण्याची माहिती दिली होती. मात्र, किमती किती वाढणार हे कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही.

एमजी (MG)

mg-hector-1.jpg
http://www.cardekho.com/

ब्रिटीश कार कंपनी एमजी देखील नवीन वर्षात कारच्या किमती वाढवणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच याची घोषणा करू शकते. Aster, Hector, Gloster आणि ZS EV सारख्या कार MG द्वारे भारतात विकल्या जातात. अमेरिकन कार कंपनी जीप भारतातही आपल्या कारच्या किमती वाढवणार आहे. मॉडेल आणि प्रकारानुसार कंपनीच्या गाड्या दोन ते चार टक्क्यांनी वाढू शकतात. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये कंपास, मेरिडियन, ग्रँड चेरोकी आणि रॅंगलर सारख्या शक्तिशाली SUV चा समावेश आहे.

मर्सिडीज (Mercedes)

mercedes.jpg
http://www.motor1.com/

नवीन वर्षात आलिशान गाड्यांच्या किमतीतही वाढ होत आहे. मर्सिडीजच्या किमतीही सुमारे पाच टक्क्यांनी वाढणार आहेत. इनपुट कॉस्टमध्ये (Input cost) सातत्याने होणारी वाढ आणि लॉजिस्टिक कॉस्टमध्ये (Logistics cost) होणारी वाढ यामुळे सर्व कार कंपन्यांकडून किमतीत वाढ करण्यात येत आहे. नवीन वर्षात ऑडीच्या गाड्याही 1.7 टक्क्यांनी महागणार आहेत. कंपनी लवकरच याची घोषणा करणार आहे. Kia भारतात कारच्या किमती वाढवणार आहे. जानेवारीमध्ये दर सुमारे 50 हजार रुपयांनी वाढू शकतात. असा अंदाज वर्तवला होता.