Tax Saving FD Interest Rate: सुरक्षित गुंतवणुकीसह (Safe investment) टॅक्स वाचवू इच्छित आहे अशा गुंतवणूकदारांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडी हा एक फायदेशीर करार आहे. या प्रकारच्या एफडीमध्ये गुंतवणूक केल्यावर, गुंतवणूकदाराला आयकराच्या कलम 80C अंतर्गत आर्थिक वर्षात 1.50 लाख रुपयांची वजावट मिळते. ज्या गुंतवणूकदारांना बँक एफडीमध्ये गुंतवणूक (investment) करून टॅक्सचा बोजा कमी करायचा आहे त्यांच्यासाठी कर बचत एफडी हा एक चांगला पर्याय आहे. यात पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. याचा अर्थ असा की एकदा गुंतवणूकदाराने एफडीमध्ये गुंतवणूक केली की, तो पाच वर्षांनीच त्याचे पैसे काढू शकतो. टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत एका आर्थिक वर्षात 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. यामध्ये तुम्ही बँकेतील तुमच्या ठेवींवर मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर व्याज घेऊ शकता. या लेखात 'टॅक्स सेव्हिंग एफडी'वर सर्वाधिक व्याज देणार्या पाच सरकारी बँकांबद्दल सांगणार आहोत.
Table of contents [Show]
'टॅक्स सेव्हिंग एफडी'वर सर्वाधिक व्याज देणार्या पाच सरकारी बँका
बँक | व्याज |
युनियन बँक ऑफ इंडिया | 6.70 टक्के |
कॅनरा बँक | 6.50 टक्के |
इंडियन ओव्हरसीज बँक | 6.40 टक्के |
इंडियन बँक | 6.90 टक्के |
बँक ऑफ इंडिया | 6.25 टक्के |
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India)
युनियन बँकेने अलीकडेच एफडी व्याजदरात वाढ केली आहे. 25 नोव्हेंबर रोजी लागू झालेल्या व्याजदरांनुसार, पाच वर्षांच्या कर बचत एफडीवर बँकेकडून 6.70 टक्के व्याज दिले जात आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे.
कॅनरा बँक (Canara Bank)
या लिस्टमध्ये कॅनरा बँकेचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनरा बँक पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर 6.50 टक्के व्याज देत आहे. यासह, एफडी घेणारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्यास, त्याला बँकेकडून 7.00 टक्के व्याज दिले जात आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank)
या लिस्टमध्ये इंडियन ओव्हरसीज बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर बँक 6.40 टक्के व्याज देत आहे. या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 6.90 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 7.15 टक्के व्याज दिले जात आहे.
इंडियन बँक (Indian Bank)
या लिस्टमध्ये इंडियन बँक चौथ्या क्रमांकावर आहे. बँकेने अलीकडेच एफडी व्याजदरात वाढ केली आहे. सध्याच्या व्याजदरानुसार, पाच वर्षांच्या कर बचत एफडीवर 6.40 टक्के व्याज दिले जात आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.90 टक्के व्याज दिले जात आहे.
बँक ऑफ इंडिया (Bank of India)
या लिस्टमध्ये बँक ऑफ इंडियाचा क्रमांक पाचवा आहे. बँकेने या महिन्यातच नवीन व्याजदर लागू केले आहेत. पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर बँक 6.25 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जात आहे.