Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Unified Lending Interface: कर्ज काढण्याची पद्धत बदलणार, RBI ने आणलेला ULI प्लॅटफॉर्म नक्की काय आहे? वाचा

Unified Lending Interface

Image Source : https://www.freepik.com/

यूएलएआय (Unified Lending Interface) प्लॅटफॉर्मला भारतातील कर्ज वितरणाची प्रक्रिया जलद व सुरळीतरित्या पार पडावी यासाठी आणण्यात आले आहे.

जनधन योजना, आधारच्या मदतीने भारतातील बँकिंग प्रणाली पूर्णपणे बदलून गेली आहे. JAM Trinity अर्थात जनधन, आधार आणि मोबाइलच्या मदतीने बँकिंग प्रणालीशी देशभरातील लाखो लोक जोडले गेले आहेत. वित्तीय समावेशनाच्या JAM प्रणालीचा मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. असे असले तरीही अद्याप वित्तीय संस्था व बँकेद्वारे कर्ज पुरवठ्याची प्रणाली हवी तशी सुरळीत झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर आरबीआयकडून  ULI प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली आहे.

यूएलआय प्लॅटफॉर्म नक्की काय आहेय़? याचा नक्की कसा फायदा होऊ शकतो? याविषयी लेखातून सविस्तर जाणून घेऊया.

यूएलआय (Unified Lending Interface) नक्की काय आहे?

यूएलएआय (Unified Lending Interface) प्लॅटफॉर्मला भारतातील कर्ज वितरणाची प्रक्रिया जलद व सुरळीतरित्या पार पडावी यासाठी आणण्यात आले आहे. सध्याच्या कर्ज वितरण प्रणालीमध्ये अनेक अडथळे पाहायला मिळते. याशिवाय, ही प्रक्रिया खूपच वेळखाऊ आहे. मात्र, यूएलआयच्या आगमनाने ही प्रक्रिया खूपच सोपी होणार आहे.

यूएलआय हे एकप्रकारे यूपीआय सारखेच असेल. ज्याप्रमाणे यूपीआयवरून एका क्लिकवर पैशांची देवाण-घेवाण करता येते. अगदी तसेच, यूएलआयच्या मदतीने एका क्लिकवर डिजिटल पद्धतीने कर्जाची सर्व प्रक्रिया पार पडेल.

कर्ज घेताना बँकेला सर्व माहिती द्यावी लागेल. मात्र, यामध्ये बराच वेळ जातो. परंतु, यूएलआय प्लॅटफॉर्मवर बँकांना कर्जदाराची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. कर्जदाराची आर्थिक स्थिती, जमिनीची मालकी यासह सर्व माहिती बँकांना कुठेही उपलब्ध होईल. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे खाते यूएलआयशी लिंक्ड असेल.

यूएलआयच्या पायलट प्रोजेक्टला सुरुवात

यूएलआयच्या पायलट प्रोजेक्टला मागील 2022 मध्येच सुरुवात झाली आहे. पायलट प्रोजेक्टच्या यशानंतर आरबीआयकडून लवकरच मोठ्या स्तरावर ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. 2022 मध्ये किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 1.6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज डिजिटल माध्यमातून देण्यास सुरुवात झाली होती.

कोणत्याही कागदपत्राशिवाय त्वरित कर्ज मंजूर होत असल्याने या पायलट प्रोजेक्टला चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय, विविध राज्यातील नागरिकांच्या जमिनीच्या मालकीची माहितीही घेण्यात आली.

यूएलआय देशातील कर्ज पुरवठा प्रणालीमध्ये क्रांती घडवेल, असे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. AM - UPI - ULI भारतातील डिजिटल सेवा बदलतील. कृषी आणि एमएसएमई क्षेत्रातील कर्ज पुरवठ्यातही बदल होतील.

यूएलआयचे नेमके फायदे काय?

यूएलआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतातील कर्ज पुरवठा प्रणालीत आमुलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. कर्ज वितरण हे वेळखाऊ व किचकट असते. मात्र, यूएलआयमुळे कर्ज पुरवठा सुरळीत, वेगाने व कमी खर्चात होईल.

अनेकदा कागदपत्रे नसल्याने कर्ज मिळण्यास अडचण येते. मात्र, या प्लॅटफॉर्ममुळे हे समस्या दूर होईल. छोटे व्यापारी, शेतकरी, एमएसएमई क्षेत्रातील उद्योजक, मध्यमवर्गीय कुटुंबांना याद्वारे सहज कर्ज उपलब्ध होईल. विविध क्षेत्रातील कर्जाची मागणी देखील यामुळे वाढेल. कर्ज पुरवठ्याच्या वितरणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.