Upcoming Electric SUV: इलेक्ट्रिक कारला लोकांचा चांगला प्रतिसाद पाहून अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा निर्णय घेत आहेत. 2022 मध्ये सुद्धा अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लाँच कलेय आणि त्यांची लोकप्रियता सुद्धा वाढली. पेट्रोलच्या किमती वाढल्या म्हणून EV ची लोकप्रियता अधिकच वाढत आहे. एलेक्ट्रिक वाहनाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे प्रदूषण थांबवण्यास मदत करते. या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये सुद्धा अनेक इलेक्ट्रिक लाँच होणार आहेत. Tata, Mahindra या दोन्ही कंपन्या 2023 मध्ये EV लॉंच करणार आहेत. जाणून घेऊया येणाऱ्या या नवीन EV बद्दल.
Table of contents [Show]
mahindra-xuv-400
महिंद्रा कंपनीची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही जानेवारी 2023 मध्ये लॉंच केली जाऊ शकते. ही महिंद्राची पहिली EV SUV आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स आणि एमजी झेडएस ईव्ही यांच्याशी स्पर्धा करणार असल्याचे सांगितले जात आहे. या मध्ये 39.4kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही कार एका चार्जमध्ये 400 च्या वर किमीपर्यंतची रेंज देईल. mahindra-xuv-400 ची किंमत 12 ते 16 लाख पर्यंत जाईल.
tata-altroz-ev
सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा सुद्धा समाविष्ट आहे. टाटाच्या EV या आधी सुद्धा लाँच झालेल्या आहेत आणि लोकानी त्याला पसंती सुद्धा दिली आहे. टाटा आणखी एक EV SUV लॉंच करणार आहे. 2023 च्या पुढील तीन महिन्यात कधीही ही SUV लॉंच केली जाऊ शकते. या कारची किंमत 12 ते 15 लाख पर्यंत जाणार आहे.
Mahindra eKUV100
सर्वाधिक SUV विक्री करणाऱ्या टॉप 5 कंपन्यांमध्ये महिंद्रा सुद्धा आहेत. Mahindra eKUV100 ही कार कंपनी जानेवारी 2023 मध्ये लॉंच करू शकते. eKUV100 कारमध्ये एक बीएलडीसी इलेक्ट्रिक मोटर दिली जाऊ शकते. एका चार्जमध्ये 150 ते 175 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. Mahindra eKUV100 या कारची किंमत 8 लाखाच्या वर आहे.
MG Air EV
MG Air EV मधील बॅटरी 100 ते 200 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. या कारची किंमत 10 लाखाच्या आत असू शकते. या कारची लांबी 2.9 मीटर असणार आहे. ही कार दिल्लीत होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये लॉंच केली जाईल. MG Air EV टू-डोर कॉम्पॅक्ट असेही ब्रिटिश ऑटोमेकर कंपनी एमजीने सांगितले आहे.