देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 2 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याजदरात (SBI Interest Rates 2022) वाढ केली. या सुधारणेचा परिणाम म्हणून बँकेने एक वर्षात मॅच्युअर्ड होणाऱ्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. ती 15 जुलै, 2022 पासून लागू झाल्याचे बँकेच्या वेबसाईटवर म्हटले आहे.
एसबीआयचे नवीन एफडी दर (New FD rate of SBI)
7 दिवस ते 45 दिवसांत मॅच्युअर्ड होणाऱ्या ठेवींवर बँक 3.50 टक्के तर 46 दिवस ते 179 दिवसांत मॅच्युअर्ड होणाऱ्या मुदत ठेवींवर स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) 4.00 टक्के व्याजदर देणार आहे. 180 दिवस ते 210 दिवसांपर्यंत मॅच्युअर्ड होणाऱ्या ठेवींवर 4.25 तर 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर एसबीआयने आपला व्याजदर 4.50 टक्के कायम ठेवला आहे. 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर्ड होणाऱ्या ठेवींवर आता 5.25 टक्के व्याज मिळणार आहे; जे पूर्वी 4.75 टक्के होते. त्यात 50 बीपीएसची वाढ करण्यात आली.
एसबीआय बँक 2 वर्षांत मॅच्युअर्ड होणाऱ्या पण 3 वर्षांपेक्षा कमी कालावधींच्या ठेवीवर 4.25 टक्के आणि 3 ते 10 वर्ष या कालावधीत मॅच्युअर्ड होणाऱ्या ठेवींवर 4.50 टक्के व्याजदर देणार आहे. दरम्यान, एसबीआयने याबाबत आपल्या वेबसाईवर नमूद केले आहे की, हे सुधारित व्याज दर नवीन ठेवी आणि मॅच्युअर्ड होणाऱ्या ठेवींच्या नूतनीकरणासाठी (Renewals of Maturing Deposits) लागू असणार आहेत. नॉन-रेसिडेंट ऑर्डिनरी (Non-resident Ordinary-NRO) अकाऊंटसाठी देशांतर्गत मुदत ठेवींसाठी (State Bank of India FD Rates) लागू होणारे दर दिले जाणार आहेत.
एसबीआयने यापूर्वी 14 जून, 2022 रोजी 2 कोटीपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर एसबीआयने आता सर्वसामान्यांसाठी 7 दिवस ते 10 वर्ष या कालावधीत मॅच्युअर्ड होणाऱ्या ठेवींवर 2.90 ते 5.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.40 ते 6.30 टक्के व्याजदर लागू केला आहे. SBI ने कर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्येही (MCLR) 10 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांची वाढ केली. एसबीआयचे हे नवीन व्याजदर 15 जुलैपासून लागू झाले आहेत. एसबीआयच्या वेबसाईटवर दिल्यानुसार, एक वर्षाच्या मुदतीचा एमसीएलआर मागील 7.40 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे घर, ऑटोमोबाईल किंवा वैयक्तिक वस्तूंसाठी काढल्या जाणाऱ्या कर्जावर जास्त व्याज दर आकारले जाऊ शकते. तसेच यामुळे काहींच्या ईएमआय (EMI) मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
Image Source - https://bit.ly/3odtBra