Most Expensive Players In 2022: ‘2022’ हे वर्ष शेवटच्या टप्प्यात आले आहे. या वर्षात क्रीडा विश्वात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असून बरेच क्रीडापटू प्रसिद्धीच्या झोकात आले आहेत. मग त्यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमधील सामने असोत किंवा FIFA World Cup 2022 मध्ये ट्रॉफीसाठी असलेली चुरस, क्रीडा रसिकांना सर्वच काही पाहायला मिळालं. वेगवेगळ्या खेळात अनेक घडामोडी घडल्या. पण तुम्हाला माहिती आहे का? 2022 मध्ये सर्वाधिक 5 महागडे खेळाडू कोणते आहेत. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

यावर्षी प्रत्येक खेळामध्ये क्रीडा रसिकांना स्पर्धात्मक चुरस पाहायला मिळाली. Forbes.com या वेबसाईटने यावर्षीचे क्रीडा क्षेत्रातील 5 सर्वाधिक महागडे खेळाडू जाहीर केले आहेत.
Table of contents [Show]
लिओनेल मेस्सी (Lionel Messi)
लिओनेल मेस्सी हे नाव हल्ली प्रत्येकाच्या मुखात ऐकायला मिळते. FIFA World Cup 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून मेस्सीने अर्जेंटिनाच्या नावावर ट्रॉफी तर केलीच पण यावर्षीच्या सर्वाधिक महागड्या खेळाडूंमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. फ़ुटबॉलच्या विश्वातील मेस्सीला ऑन फिल्ड 75 मिलियन डॉलर्स तर ऑफ फिल्ड 55 मिलियन डॉलर्स मिळाले आहेत. त्याला एकूण 130 मिलियन डॉलर्स मिळाले आहेत.
लेब्रॉन जेम्स(Lebron James)
लेब्रॉन रेमोन जेम्स सीनियर हा नॅशनल बास्केटबॉल(Basketball) असोसिएशनच्या लॉस एंजेलिस लेकर्सचा अमेरिकन बास्केटबॉल(Basketball) खेळाडू आहे. "किंग जेम्स" या टोपणनावाने आपण सर्वच त्याला ओळखतो. आजवरचा सर्वोत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडूंपैकी एक म्हणून त्याला ओळखले जाते. लेब्रॉन जेम्स देखील महागड्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला ऑन फिल्ड 41.2 मिलियन डॉलर्स तर ऑफ फिल्ड 80 मिलियन डॉलर्स मिळाले आहेत.त्याला एकूण 121.2 मिलियन डॉलर्स मिळाले आहेत.
क्रिस्टियानो रोनाल्डो(Cristiano Ronaldo)
पोर्तुगाल संघातील आघाडीचा फुटबॉल(Football) खेळाडू म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डोला संपूर्ण जग ओळखते. सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्याला ऑन फिल्ड 60 मिलियन डॉलर्स तर ऑफ फिल्ड 55 मिलियन डॉलर्स मिळाले असून एकूण 115 मिलियन डॉलर्स मिळाले आहेत.
नेमार(Neymar)
नेमार दा सिल्वा सँटोस ज्युनियर, ज्याला आपण 'नेमार' म्हणून ओळखतो. ब्राझिलियन(Brazilian) फुटबॉलपटू या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याला ऑन फिल्ड 70 मिलियन डॉलर्स तर ऑफ फिल्ड 25 मिलियन डॉलर्स मिळाले आहेत. अशा प्रकारे त्याला एकूण 95 मिलियन डॉलर्स मिळाले आहेत.
स्टीफन करी(Stephen Curry)
वॉर्डेल स्टीफन करी हा नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या गोल्डन स्टेट वॉरियर्सचा अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू आहे.जो पाचव्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला ऑन फिल्ड 45.8 मिलियन डॉलर्स तर ऑफ फिल्ड 47 मिलियन डॉलर्स मिळाले आहेत. अशा प्रकारे त्याला एकूण 98.2 मिलियन डॉलर्स मिळाले आहेत.
याशिवाय या यादीत सहाव्या क्रमांकावर केविन ड्युरंट, सातव्या स्थानावर रॉजर फेडरर, आठव्या स्थावर कॅनेलो अल्वारेझ, नवव्या स्थानी टॉम ब्रॅडी आणि दहाव्या स्थानी GIANNIS ANTETOKOUNMPO चा नंबर लागतो.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            