Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बर्थडे बॉय, स्टार फुटबॉलपट्टू Kylian Mbappé ने FIFA World Cup 2022 मध्ये किती पैसे कमावले?

Kylian Mbappé

Image Source : www.stylecaster.com

आज 20 डिसेंबर, FIFA World Cup 2022 ची फायनल मॅच गाजवणारा Kylian Mbappé याचा वाढदिवस! 24 वर्षांच्या एम्बाप्पेच्या नावे अनेक रेकॉर्ड्स आहेत. यंदाच्या FIFA World Cup मध्ये त्याला गोल्डन बूट, सिल्व्हर बॉल असा बहुमान मिळाला. सोशल मिडियावर त्याच्या गोलची चर्चा अजुनही सुरू आहे. या स्टार खेळाडुचे नेटवर्थ काय, त्याला FIFA World Cup मधून किती पैसे मिळाले हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात, तर हा लेख वाचाच..

FIFA World Cup 2022 मध्ये फ्रेंच खेळाडू किलियन एम्बाप्पे (Kylian Mbappé) याने सर्व फुटबॉलप्रेमींचे मन जिंकले. फ्रान्स संघ विश्वचषक जिंकू शकला नाही, परंतु खेळ कमालीचा खेळला. त्या खेळाचा स्टार होता आपला बर्थडे बॉय किलियन एम्बाप्पे! एम्बाप्पेने फायनल मॅचमध्ये 8 गोल करत, सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला तर याच मॅचमध्ये हॅट्रीक करून 56 वर्षे जुन्या रेकॉर्डची बरोबरी केली. या कामगिरीमुळे त्याने FIFA World Cup स्पर्धेत गोल्डन बूट, सिल्व्हर बॉल आपल्या नावे केला. या  सर्वाधिक चर्चा होणाऱ्या फुटबॉलपट्टूची नेटवर्थ काय आहे माहितीय?

एम्बाप्पेचा मूळ पगार किती आहे? How does Mbappé earn?

बर्थडे बॉय, फ्रेंचचा स्टार फुटबॉलपट्टू एम्बाप्पेची गणना सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये केली जाते. एम्बाप्पे दरवर्षी 10 मिलियन युएस डॉलर्स कमावतो. तर, त्याचा मूळ पगार 53 मिलियन युएस डॉलर्स एवढा आहे. या 24 वर्षीय खेळाडूची एकूण संपत्ती 150 मिलियन युएस डॉलर्स एवढी झाली आहे.

फोर्ब्सच्या अहवालानुसार, एम्बाप्पेने 2022 मध्ये 46.74 मिलियन युएस डॉलर्स कमावले आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या स्पोर्टिकोच्या अहवालानुसार, त्याचे एकूण वार्षिक उत्पन्न 132.80 मिलियन युएस डॉलर्स इतके आहे. एम्बाप्पेने  Nike सोबत व्यावसायिक भागीदारी केली आहे, म्हणूनच त्याची नेटवर्थ वाढून आता १५० मिलियन युएस डॉलर्सवर पोहोचली आहे.

एम्बाप्पेने FIFA World Cup 2022 मध्ये किती कमावले?

फ्रान्स FIFA World Cup 2022 खेळाचा विजयी संघ नाही, तरी सर्व सहभागी संघांना निधीरुपात पारितोषिके दिली जातात. फ्रान्स उपविजेता (Runner Up) संघ ठरल्यामुळे त्यांना  34.5 मिलियन युएस डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळाली. हे पैसे खेळाडूंमध्ये वाटले जातात, तसेच फेडरेशनसाठीही राखीव ठेवले जातात. तर फ्रान्स संघाच्या प्रत्येक खेळाडूला 3 लाख 85 हजार युएस डॉलर्स मिळाले. अर्थात, स्टार प्लेअर एम्बाप्पेलाही 3 लाख 85 हजार युएस डॉलर्स मिळालेत. यासह, एम्बाप्पेच्या कामगिरीसाठी त्याला सॉकर फेडरेशनकडून अधिकचे 5 लाख 86 हजार युएस डॉलर्स देण्यात येणार आहेत.

एम्बाप्पेचा दानशूरपणा Charity by Mbappé 

मार्च महिन्यात इंग्लंडमध्ये विमान बेपत्ता झाले होते. यात अर्जेटीनाचा फुटबॉलपटू एमिलियानो साला होता, त्यामुळे तोही हरवला होता. अशावेळी एम्बाप्पे पुढे आला आणि त्याने साला याला शोधण्यासाठी वैयक्तिक मिशनसाठी एका क्राउडफंडिंग मोहिमेसाठी 34 हजार युएस डॉलर्स दिले.
तसेच, नुकतेच एम्बाप्पेने  अंपग मुलांच्या संगोपनासाठी 5 लाख युएस डॉलर्स सामाजिक संस्थांना दिले आहेत.