• 28 Nov, 2022 16:50

Highest Interest Rates on FD : या 5 बॅंका एफडीवर देत आहेत 8 टक्के व्याजदर!

Highest Interest Rates on FD

Highest Interest Rates on FD : रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बऱ्याच बॅंकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. ईएसएएफ स्मॉल फायनान्स बॅंकेने तर 999 दिवसांसाठी स्पेशल मुदत ठेव योजना लॉन्च केली असून यासाठी 8.50 टक्के व्याजदर निश्चित केला आहे.

Get 8 % Interest Rate : मुदत ठेवींमधील गुंतवणूक ही सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी गुंतवणूक मानली जाते. रिझर्व्ह बॅंकेने या आर्थिक वर्षात किमान 4 वेळा रेपो दरात (Repo Rate) वाढ केली. आरबीआयच्या रेपो दरवाढीनंतर बॅंकांनी कर्जाच्या व्याजदरात जशी वाढ केली. त्याप्रमाणे मुदत ठेवींच्या योजनांच्या (Interest Rate Hike on Fixed Deposit Scheme) व्याजदरातही वाढ केली. सध्या तर अनेक बॅंकांनी मुदत ठेवींच्या (Fixed Deposit) व्याजदरात भरघोस वाढ केल्याचे दिसून येत आहे. काही बॅंका 8 ते 8.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत.

देशातील महत्त्वाच्या बॅंकांसोबत स्मॉल फानयानान्स बॅंकांनीही मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. पूर्वी म्हणजे 30-40 वर्षांपूर्वी बॅंका मुदत ठेवींवर चांगला व्याजदर देत होत्या. त्यानंतरच्या कालावधीत आणि गेल्या काही वर्षांत मुदत ठेवींवरील व्याजदराच खूपच घसरण झाल्याचे दिसून येते. पण आता पुन्हा काही बॅंका चांगले व्याजदर देत आहेत. रिझर्व्ह बॅंकेकडून सातत्याने व्याजदरात वाढ होत असल्यामुळे येत्या काळात मुदत ठेवींवरील व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या घडीला काही बॅंका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 8 टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर देत आहे.

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बॅंक एफडी (ESAF Small Finance Bank FD)

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बॅंकेने 999 दिवसांची स्पेशल मुदत ठेव योजना आणली आहे. या योजनेमध्ये सर्वसामान्य ग्राहकांना 8 टक्के व्याजदर दिला जाणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ही बॅंक सर्वाधिक म्हणज 8.50 टक्के व्याजदर देत आहे. या योजनेमध्ये 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

बंधन बॅंक (Bandhan Bank) 

बंधन बॅंकेने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर व्याजदरात स्पेशल दर जाहीर केला आहे. यासाठी बंधन बॅंकेने स्पेशल लिमिटेड पीरिअड ऑफर लॉन्च केली. बॅंकेचे नवीन दर 7 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. या स्पेशल ऑफर अंतर्गत बॅंक 600 दिवसांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज देत आहे. तर याच कालावधीसाठी सिनिअर सिटिझन्सना 8 टक्के व्याज देत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बॅंक एफडी (Suryoday Small Finance Bank FD)

सूर्योदय स्मॉल फायनान्स बॅंकेनेही नुकतेच मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. बॅंकेने सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.25 ते 0.52 टक्के एवढी वाढ केली. तर 999 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना सूर्योदय बॅंक 8.01 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.26 टक्के व्याजदर देत आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बॅंक एफडी (Unity SFB FD)

युनिटी स्मॉल फायनान्स बॅंक सर्व प्रकारच्या ग्राहकांना मुदत ठेवींवर 8.3 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत हे. तसेच बॅंकेची 366 दिवसांच्या विशेष ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना बॅंक 8.3 टक्के दर देत आहे. तर सर्वसामान्य ग्राहकांना 366 दिवसांच्या ठेवींवर 7.80 टक्के व्याजदर दिला जात आहे. ही स्पेशल ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे.

एयू बॅंक एफडी (AU Bank FD)

एयू बॅंकेनेही मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. बॅंक सध्या सर्वसामान्या ग्राहकांना 7.5 टक्के इतका व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्क्यांपर्यंतचा दर देत आहे.

काही कंपन्या कंपनी एफडीवर 8.9 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. जसे की, श्रीराम सिटी, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड ज्येष्ठ महिला ग्राहकांना मुदत ठेवींवर 8.9 टक्के तर ज्येष्ठ पुरूष नागरिकांना 8.8 टक्के व्याज देत आहेत. या कंपनीची ही योजना 14 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.