रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीनंतर बँकांमध्ये व्याजदर वाढीची स्पर्धा लागली आहे. ठेवीदारांना आकर्षित बँका, एनबीएफसी, स्मॉफ फायनान्स बँका, पेमेंट बँकांकडून डिपॉझिटवर चांगला इंटरेस्ट रेट ऑफर केला जात आहे. मागील तीन महिन्यांत डिपॉझिटचा रेट 7% च्या नजीक पोहोचला. ज्याचा फायदा विशेष करुन सिनियर सिटीझन्सला झाला आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवीवर 7.50% व्याजदर जाहीर केला आहे. (Fincare Small Finance Bank offers 8% interest on deposit) ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का जादा म्हणजेच 8% व्याज देण्याची घोषणा फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने केली. ठेवींवरील सुधारित व्याजदर 21 ऑगस्ट 2022 पासून लागू झाल्याचे बँकेने म्हटलं आहे. 2 कोटींहून कमी रकमेच्या 1000 दिवसांच्या मुदत ठेवीवर सर्वसाधारण नागरिकांसाठी 7.50% व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8% व्याज देण्यात येणार आहे.
याशिवाय 7 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3% आणि 46 ते 90 दिवसांच्या ठेवीवर 3.50% इंटरेस्ट दिले जाणार आहे. 91 दिवस ते 180 दिवसांच्या मुदत ठेवीवर ठेवीदाराला 4% व्याज मिळणार आहे. 181 दिवस ते 364 दिवसांच्या मुदत ठेवीवर 5.40% व्याज दिले जाणार आहे. 12 ते 15 महिन्यांच्या ठेवींवर 6.75% इतके व्याज दिले जाणार असल्याचे फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने म्हटलं आहे. 15 महिन्यासाठीची मुदत ठेव, 1 दिवस ते 499 दिवस यासाठी ठेवीदर 6.75% असेल. 500 दिवसांसाठी तो 7% असेल, असे बँकेने म्हटलं आहे. फिक्स्ड डिपॉझिट जे 501 दिवस ते 24 महिन्यांच्या कालावधीसाठी असतील त्यावर बँकेकडून 6.75% व्याज दिले जाणार आहे.24 महिने ते 749 दिवसांसाठी 7% व्याज असेल.
ज्येष्ठांना मिळेल जादा व्याज
इतर बँकांप्रमाणे फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर 0.50% अधिक व्याज देण्यात येणार आहे. वय वर्ष 60 पूर्ण केलेल्या ठेवीदांरांना ज्येष्ठ नागरिक या श्रेणीत ग्राह्य धरुन त्यांच्या मुदत ठेवींवर विशेष व्याज दिले जाईल. संयुक्त खाते असल्यास विशेष व्याजदरासाठी या खात्याचा प्रथम अकाउंट होल्डर ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक आहे, असे बँकेने स्पष्ट केले आहे.