Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MG Hector ची नेक्स्ट-जनरेशन कार मिळणार फक्त 14.72 लाखांपासून!

MG Hector Next Generation car

Image Source : www.carwale.com

MG Hector ची नेक्स्ट-जनरेशन कार ग्राहकांना फक्त 14.72 लाखांपासून मार्केटमध्ये उपलब्ध होणार असून स्टाईल, स्मार्ट, स्मार्ट प्रो, शार्प प्रो आणि सेवी प्रो या 5 व्हेरिएंट्समध्ये ही कार येणार आहे.

MG Hector: प्रत्येकाला आयुष्यात थोडे पैसे सेविंग झाल्यानंतर दोन गोष्टी या नक्कीच करायच्या असतात. पहिली म्हणजे स्वतःच घर(Home) घ्यायचं असतं आणि दुसरी म्हणजे स्वतःची ड्रीम कार(Dream Car) खरेदी करायची असते. अनेकांच्या याच ड्रीम कारच्या लिस्टमध्ये 'MG Hector' या गाडीचा समावेश नक्कीच असतो. MG Hector च्या चाहत्यांसाठी आज आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. 
एमजी मोटर इंडिया कंपनीने नुकतीच त्यांची आगामी एमजी नेक्स्ट-जनरेशन हेक्टरची (MG Hector) घोषणा केली आहे. ही नेक्स्ट-जनरेशन हेक्टर फक्त 14.72 लाखांपासून मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. स्टाईल(Smile), स्मार्ट(Smart), स्मार्ट प्रो(Smart Pro), शार्प प्रो(Sharp Pro) आणि सेवी प्रो(Sevi Pro) या 5 व्हेरिएंट्समध्ये ही कार येणार आहे. नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अनेक अपडेटेड टेक्नॉलॉजी वापरण्यात आल्या आहेत. 11 ऑटोनॉमस लेव्हल 2 (ADAS) वैशिष्ट्ये आहेत, जी ड्रायव्हिंगसाठी अत्यंत सुरक्षित आणि आरामदायी आहेत. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.  

असे असणार कारचे इंटेरिअर

नवीन एसयूव्हीचे लक्षवेधक इंटीरिअर्स ड्युअल-ओन अर्जाइल ब्राऊन आणि ब्लॅक थीमसह वूडन फिनिशमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रमुख एसयूव्ही(SUV) 5, 6 आणि 7-सीटर कन्फिग्युरेशन्समध्ये(Configurations) हे उपलब्ध आहे. 6 आसनी एसयूव्ही सीट्स कॅप्टन कन्फिग्युरेशनमध्ये(Captain configuration) येतात, तर 7 आसनी वेईकलमध्ये बेंच सीट्स(Bench Seats) देण्यात आल्या आहेत. नेक्स्ट जनरेशन एमजी हेक्टरमध्ये नवीन सादर करण्यात आलेले स्मार्ट ऑटो टर्न इंडिकेटर्स(Smart Auto Turn Indicators) सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देते. स्टीअरिंग अँगलवर आधारित संबंधित इंडीकेटर लाईट आपोआपपणे ऑन(On) आणि ऑफ(Off) होते. हे ऑटोमॅटिक सिग्नल(Automatic Signal) पार्किंगमधून रस्त्यावर येताना किंवा यू-टर्न(U-turn) घेताना ड्रायव्हर जर   इंडीकेटर देण्यास विसरला तर कामी येते. तसेच नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये 75 हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्यांसह 100 वॉईस कमांड्स आहेत, ज्याचे श्रेय आय-स्मार्ट(i-Smart) तंत्रज्ञानाला जाते, ज्यामध्ये स्मार्टर व आनंददायी ड्राइव्हसाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कनेक्टीव्हीटी, सर्विसेस आणि अॅप्लीकेशन्स देण्यात आली आहेत.

पाच भारतीय भाषांमध्ये नेव्हिगेशन वॉईसचे मार्गदर्शन आणि बरंच काही

आय-स्मार्ट(i-Smart) तंत्रज्ञानासह समाविष्ट करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरच्या वॉईस कमांड्समध्ये सेगमेंट-फर्स्ट(Segment-first) वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. जसे की, सनरूफसाठी टच-स्क्रिन कंट्रोल, अॅम्बियण्ट लाइट्ससाठी(Ambient lights) वॉईस कमांड्स, पाच भारतीय भाषांमध्ये नेव्हिगेशन वॉईसचे मार्गदर्शन उपलब्ध, 50 हून अधिक हिंदी आणि इंग्लिश मिश्रित हिंग्लिश कमांड्स आणि इतर उपयुक्त अॅप्स जसे पार्किंग शोधण्यासाठी व बुक करण्यासाठी पार्क+(Park+) आणि म्युझिकसाठी जिओ-सावन अॅप(Jio-Saavn app) देण्यात आले आहे.  इन्फिनिटीद्वारे प्रिमिअम ऑडिओ सिस्टम वायरलेस अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कारप्लेसह येत असल्याने सर्वोत्तम साऊंड मिळण्यास मदत होते. 
नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अनेक प्रमुख सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत, जसे की 6 एअरबॅग्स(Airbags), 360-डिग्री एचडी कॅमेरा(HD camera), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS), हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी), ऑल फोर-व्हील डिस्क ब्रेक्स, सर्व आसनांकरिता 3-पॉइण्ट सीट बेल्ट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक (EPB) आणि फ्रण्ट पार्किंग सेन्सर्स देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.