Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Buy Cars on Subscription : कार बजेटमध्ये नाही; मग 'सब्सक्राईब' करायला काय हरकत!

Buy Cars on Subscription

Buy Cars on Subscription : मागील दोन दशकांपासून कार खरेदीची संख्या घटली आहे. परिणामी कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी आणि ग्राहकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कार कंपन्यांनी कार सब्सक्रिप्शनचा पर्याय आणला आहे.

देशात इंधनाचे दर आणि व्याजदर सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत कार खरेदी करणं हे लोकांसाठी जणू स्वप्नंच ठरत आहे. जर तुम्हाला नवीन कार खरेदी करणे परवडत नसेल तर आता काही निवडक कार कंपन्यांसह, काही प्रायव्हेट प्लेअर्सनी तुमच्यासाठी कार सब्सक्रिप्शनचा पर्याय आणला आहे. त्यामुळे लोकांना आता कारची हौस भागवण्यासाठी ती प्रत्यक्षात खरेदी करावी लागणार नाही. तुम्ही तुमच्या पसंतीची कार सब्सक्राईब (Car Subscription) करू शकता. 

कार सब्सक्रिप्शन म्हणजे काय? (What is car subscription?)

मागील दोन दशकांपासून कार विक्रीची संख्या घटली आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी आणि ग्राहकांना कोणतीही अडचण न येता कमी किमतीत कार उपलब्ध करून देण्यासाठी कार कंपन्यांनी ग्राहकांसाठी कार सब्सक्रिप्शनचा पर्याय आणला आहे. वास्तविक पूर्वी आपल्या घरासमोर कार उभी करण्यासाठी ती खरेदी करावी लागत होती. परंतु, आता तसे करावे लागणार नाही. आता काही वेळातच तुम्हाला हव्या असलेल्या कारचे सब्सक्रिप्शन घेता येणार आहे. या सब्सक्रिप्शनमध्ये तुम्हाला ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. यानंतर तुम्ही ठराविक वेळेसाठी गाडी आपल्या घरी घेवून जावू शकता आणि सब्सक्रिप्शनचा कालावधी संपेपर्यंत ती तुमच्याजवळ ठेवू शकता.

असे होते कार सब्सक्रिप्शन (How to Subscribe car)

कारच्या सब्सक्रिप्शन मॉडेलमध्ये तुम्ही कोणत्याही डाऊन पेमेंटशिवाय नवी कार घेवू शकता. यामध्ये तुम्हाला प्री-फिक्स्ड मासिक सब्सक्रिप्शन द्यावे लागेल. त्याचप्रमाणे यामध्ये तुम्हाला इंधनाचा खर्चही द्यावा लागणार आहे. इन्शुरन्स, रोड टॅक्स, मेन्टेनन्स आणि नोंदणीचा खर्च कार कंपनी उचलते.

ग्राहकांना मिळतो ‘हा’ फायदा (Customers Benefit)

या सब्सक्रिप्शन प्लानचा ग्राहकांना खूप फायदा होतो. एक कार महिनाभऱ वापरल्यानंतर ते दुसऱ्या कारला सब्सक्राइब करु शकतात. गाडी पसंत नसेल तर ग्राहक त्याच्या मनाप्रमाणे दुसऱ्या गाडीकडे वळू शकतो. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे ग्राहकाला कोणतेही डाऊनपेमेंट द्यावे लागत नाही. गाडी घेण्यासाठी इतर कोणते शुल्क ही द्यावे लागत नाही.

या कंपन्या देतात सब्सक्रिप्शन!

ह्युंदाई, फॉक्सवॅगन, निस्सान, एमजी मोटर्स, महिंद्रा, मारूती, टाटा या प्रमुख कंपन्या ग्राहकांना सब्सक्रिप्शनवर कार देतात. Quiklyz आणि carsubscriptions सारख्या साईट्सवर सहजपणे सब्सक्रिप्शन करता येते.