Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vodafone Layoff: जागतिक दूरसंचार कंपनी वोडाफोन करणार मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात!

Vodafone

Image Source : www.timesnownews.com

जागतिक दूरसंचार कंपनी (Telecommunications Company) असलेली वोडाफोन (Vodafone) कंपनी जगभरात सुमारे 104,000 लोकांना रोजगार देते. याच कंपनीने आता शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सर्वात जास्त कर्मचारी हे कंपनीच्या लंडन मुख्यालयातून काढून टाकले गेले आहेत.

प्रदीर्घ आर्थिक मंदीमुळे कॉर्पोरेट क्षेत्राने कर्मचारी कपात करण्याचा सपाटा लावलाय. Apple, Twitter, Meta, आणि Amazon सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांची कमाई देखील आता मंद गतीने होत आहे आणि त्यामुळे खर्च वाचवण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी केला जात आहे.

गेल्या वर्षी, हजारो व्यक्तींनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या होत्या आणि 2023 मध्ये देखील हे दुःस्वप्न चालूच असल्याचे दिसते आहे. Amazon, Cisco, Salesforce आणि Ola द्वारे अलीकडेच कर्मचारी कपात केली होती. आता वोडाफोनने देखील कर्मचारी कपात करणार असल्याचे जाहीर केले आहे.

जागतिक दूरसंचार कंपनी, जी जगभरात सुमारे 104,000 लोकांना रोजगार देते, शेकडो कर्मचारी सदस्यांना सोडून देण्याचा मानस आहे, बहुतेक त्याच्या लंडन मुख्यालयातून. भारतामध्ये देखील कंपनीच्या कर्मचार्‍यांवर परिणाम होणार आहे. भारतात वोडाफोन Vi या ब्रँड नावाखाली Idea सोबत एकत्रित काम करत आहे. भारतात किती लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नोव्हेंबरमधेच वोडाफोनने खर्च कपातीची घोषणा केली होती.ज्यामध्ये कंपनीने बाजारातील कमकुवत वातावरणाला प्रतिसाद म्हणून खर्च-कपात उपाय लागू करण्याचा आपला हेतू उघड केला होता. 2026 पर्यंत, जवळपास 1.08 बिलियन डॉलरने खर्च कमी करण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे.

परिणामी, कंपनीचे सीईओ निक रीड (Nick Read) यांनीही आपला राजीनामा दिला आहे. कारण त्यांच्या नेतृत्वात कंपनीचे मूल्य 40% ने घसरले होते. वोडाफोनच्या मुख्य आर्थिक अधिकारी (Chief Financial Officer) मार्गेरिटा डेला व्हॅले (Marguerita Della Valle) या प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.