Hyundai ने असे जाहीर केले आहे की, ते कूलंट लीकच्या समस्येमुळे यूएस मधील Kona EV चे 853 युनिट्स परत मागवत आहेत. निवडक कोआन ईव्हीच्या इलेक्ट्रिक पॉवर कंट्रोल युनिट (EPCU) मध्ये अंतर्गत गळतीमुळे वीज कमी होऊ शकते किंवा वाहन थांबू शकते, असे कंपनीने म्हटले आहे.
या दोषामुळे कोणत्याही अपघात घडल्याची माहिती नाही. परंतु कोना ईव्हीमध्ये वीज गेल्याच्या अनेक बातम्या आलेल्या आहेत. कार ब्रँडने याविषयी असेही म्हटले आहे की, प्रभावित मॉडेल्स त्याच्या डीलरशिपवर फ्रेममध्ये दुरुस्त केल्या जाणार आहेत. प्रभावित 2021 मॉडेल वर्ष EPCU सह सुसज्ज Hyundai Kona EVs ला DC कन्व्हर्टर हाऊसिंगमध्ये काही सैल सीलिंग असू शकते, असे सांगण्यात आले आहे. तसेच, या गंभीर घटकाचा उत्पादना दरम्यानच्या प्रक्रियेत वाफेच्या साफसफाईच्या कमतरतेमुळे हा दोष झाल्याचे सांगितले गेले आहे.
नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने त्याच्या रिकॉल डॉक्युमेंटमध्ये याविषयी नोंद केली आहे. संभाव्य अंतर्गत शीतलक गळतीमुळे प्रभावित कार मुख्य नियंत्रकावर परिणाम करू शकतात, असे यात नमूद करण्यात आले आहे. यामुळे अचानक वीज जाणे किंवा वाहन पूर्णपणे बंद होऊ शकते. या दोषामुळे, काही वाहन मालकांना त्यांच्या ड्रायव्हर माहिती प्लॅटफॉर्मवर एक वॉर्निंग मेसेज प्राप्त होऊ शकतो.
या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला संभाव्य समस्या लक्षात आली. अंतर्गत तपासणी करण्यात आली. यानंतर ह्युंदाईने या वर्षी 9 डिसेंबर रोजी वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला, असे या कार ब्रॅंडकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत पुढील वर्षी 14 फेब्रुवारीपर्यंत रिकॉलबद्दल डीलर्सना माहिती दिली जाणार नाही. ऑटोमेकर संबंधित मालकांना त्याच वेळी रिकॉलबद्दल सूचित करणार आहेत, असे यासंबंधी सांगण्यात आले आहे.