Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Savings Tricks: 10 लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न असलं तरी वाचवता येऊ शकतो कर, 'या' आहेत ट्रिक्स!

Tax saving

नोकरी किंवा व्यवसायातून तुम्ही वर्षाला जर 10 लाखांहून अधिक उत्पन्न कमवत असाल तरीही तुम्ही कर सवलत मिळवू शकता. व्यवस्थित टॅक्स प्लॅनिंग जर केलं तर तुम्हांला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.

2022-23 हे आर्थिक वर्ष संपत आलं आहे. येत्या एप्रिल पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होईल. नव्या आर्थिक वर्षात तुम्ही अशा काही गुंतवणूक करू शकता ज्यामुळे तुमची गुंतवणूक देखील होईल आणि कर देखील वाचेल. टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हांला काय करणे गरजेचे आहे ते सांगण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे आम्ही करत आहोत. 
इन्कम टॅक्सबाबत असे अनेक नियम आणि तरतुदी आहेत ज्यामुळे तुम्हाला टॅक्स डिडक्शनची सुविधा मिळते. या पैकी, कलम 80C सर्वांत लोकप्रिय आहे. याशिवाय, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आणि आरोग्य विम्याचा वापर करूनदेखील कर वाचवता येऊ शकतो.

स्टँडर्ड डिडक्शनचा कसा घ्याल फायदा?

2018 च्या अर्थ संकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेचा समावेश केला होता. स्टँडर्ड डिडक्शन योजनेनुसार पगारदार कर्मचारी आणि पेंशन मिळवणारे निवृत्त कर्मचारी या योजनेचा फायदा घेऊ शकतात.  याद्वारे जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शनचा दावा कर्मचारी करू शकतात. 
तुमचे आर्थिक उत्पन्न 10.50 लाख जर असेल तर 50 हजार रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शनचा दावा केल्यानंतर केवळ 10 लाख रकमेवर कर बसेल. 

सेक्शन 80 C: पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees’ Provident Fund), इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम (Equity Linked Saving Scheme), नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (National Saving Scheme), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana), यूनिट लिंक इन्व्हेस्टमेंट प्लान(Unit Link Investment Plan Scheme), मुदत ठेव योजना (Fixed Deposit) आदी गुंतवणुकीवर 1.50 पर्यंत कर सवलत दिली जाते. म्हणजे तुमचे करपात्र उत्पन्न आता 8.50 लाख इतके आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) योजनेत गुंतवणूक केल्यास 80 सीसीडी (1B) नुसार अतिरिक्त 50 हजारांची कर सवलत मिळते. म्हणजे आता तुमचे करपात्र उत्पन्न आहे 8 लाख! 

गृह कर्जावर सवलत: सरकारी नोकरदारांना गृहकर्जावर कर सवलत मिळते. एका आर्थिक वर्षात गृहकर्जाच्या व्याजावर दोन लाख पर्यंत कर सवलतीचा क्लेम करता येतो. असे केल्यास तुमचे करपात्र उत्पन्न उरेल केवळ 6 लाख रुपये.

आरोग्य विमा: आयकराच्या कलम 80D अंतर्गत आरोग्य विमा असल्यास 25 हजारांची कर सवलत मिळते. हीच कर सवलत ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 हजार इतकी आहे. अशा परिस्थितीत करपात्र उत्पन्न शिल्लक राहते 5.25 लाख. 

सामाजिक नोंदणीकृत संस्थांना देणगी: सामाजिक कार्यासाठी दान देत असाल तर 25 हजार रुपयांची कर सवलत तुम्हांला मिळू शकते. 

असे नियोजन केल्यास तुम्ही 5 लाख करपात्र उत्पन्नाच्या श्रेणीत येता. पाच टक्क्यांच्या हिशोबाने 12 हजार 500 रुपये कर भरावा लागेल. मात्र, कलम 87A अंतर्गत, तुम्हाला पाच लाख रुपयांच्या टॅक्स स्लॅबवर 12 हजार 500 रुपयांची कर सवलत मिळेल. याचाच अर्थ  उत्तम टॅक्स प्लॅनिंग केल्यास तुम्हांला कर भरावा लागणार नाही.