इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ईएलएसएस म्युच्युअल फंड (ELSS Mutual Fund) हे चांगल्या परताव्यासाठी गुंतवणुकीचे साधन आहे. ELSS फंडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या फंडमधून गुंतवणूकदाराला टॅक्समध्ये सूट देखील मिळते. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत तुम्हाला 1.50 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सवलत मिळू शकते. आज आपण अशाच एका ELSS Mutual Fund बद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने टॅक्स सवलतीसह चांगला परतावाही दिला आहे. या ईएलएसएस फंडचे नाव आहे, युनियन लॉंग टर्म इक्विटी फंड (Union Long Term Equity Fund).
जानेवारी, 2013 मध्ये सुरू झालेल्या या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांना आतापर्यंत चांगला परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षात युनियन लॉंग टर्म इक्विटी फंडाने वार्षिक 15 टक्क्यांचा परतावा दिला आहे. दरम्यान, गेल्या एक वर्षात म्हणजे 14 जुलै, 2021 ते 14 जुलै, 2022 या कालावधीत या फंडाच्या एसआयपीने 8.87 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मार्केटमधील अस्थिरता हे नकारात्मक परताव्याचे मुख्य कारण आहे. दरम्यान, गेल्या 2 वर्षात याच्या समभागाने सुमारे 12.01 टक्के 12.74 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडाने 3 वर्षांच्या कालावधीत 18.23 टक्के आणि 30.76 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. वार्षिक 14.89 टक्के आणि 5 वर्षात 45.14 टक्के परतावा दिला आहे.
4 स्टार रेटिंग फंड!
एखाद्या गुंतवणूकदाराने या म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक महिन्याला (Systematic Investment Plan-SIP) 10 हजार रूपये जमा केले असते तर दोन वर्षात यातून 2.72 लाख रूपये जमा झाले असते. त्याचप्रमाणे, 3 वर्षांत 4.35 लाख, 5 वर्षात 8.96 लाख रूपये जमा झाले असते. या कामगिरीच्या आधारे CRISILने या फंडाला 4 स्टार रेटिंग दिले आहे.
या फंडची एकूण व्हॅल्यू अंदाजे 478.5 कोटी रूपये आहे. यातील बहुतांश गुंतवणूक ही 96.70 टक्के इक्विटीमध्ये, 0.06 टक्के डेब्ट फंडमध्ये (Debt Fund) आणि 4.24 टक्के इतर ठिकाणी गुंतवण्यात आली आहे.